TRENDING:

Weekly Rashi Bhavishya In Marathi: आठवड्यात अनेक शुभ योग! फेब्रुवारीचा शेवट कोणासाठी कसा? साप्ताहिक राशीभविष्य

Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 26 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य
advertisement
1/12
आठवड्यात अनेक शुभ योग! फेब्रुवारीचा शेवट कोणासाठी कसा? साप्ताहिक राशीभविष्य
मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असेल. आठवड्याच्या सुरुवातीला जवळचा मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा निघेल. त्यामुळे <a href="http://news18marathi.com/photogallery/astrology/people-of-this-zodiac-sign-are-more-likely-to-win-the-lottery-look-at-it-once-mhrp-1133784.html">तुम्हाला मोठा दिलासा मिळेल</a>. आठवड्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नशीबाची साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सत्ता आणि प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. घरात आणि बाहेर त्यांचा मान-सन्मान वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यात खूप रस निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. आरोग्य सामान्य राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : GoldenLucky Number : 11
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हीकडे खूप लक्ष द्यावं लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या सीझनल आजाराने त्रास होईल किंवा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. या काळात आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. या आठवड्यात घरातल्या आणि बाहेरच्या व्यक्तींच्या लहानसहान टोमण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा. नातेवाईकांकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला थोडं वाईट वाटेल. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना आठवड्याच्या उत्तरार्धात काही समस्यांना सामोरं जावं लागेल. त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी कठोर स्पर्धा करावी लागेल. तरुण व्यावसायिकांवर थोडा दबाव असेल. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. त्याऐवजी योग्य वेळेची वाट बघा. तुम्ही आधीपासून प्रेमात असाल तर कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. कठीण काळात तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला बळ देईल.Lucky Color : Maroon Lucky Number : 3
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील; पण आरोग्य किंवा घरगुती समस्यांमुळे तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकणार नाही. व्यावसायिकांसाठी हा आठवडा जेमतेम असेल. मार्केटमध्ये अडकलेले पैसे काढण्यात अडचणी येतील. जर तुम्ही एखाद्यासोबत नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर आर्थिक व्यवहारात खूप सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या मध्यात अनावश्यक अडचणीत न पडता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी अतिरिक्त कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात घराच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च होऊ शकतो. यामुळे तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. किरकोळ वाद वगळता वैवाहिक जीवन सामान्य राहील.Lucky Color : Violet Lucky Number : 9
advertisement
4/12
कर्क (Cancer) : या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांचं नियोजित काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कष्ट, प्रयत्न आणि वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान तुमच्या सामानाची आणि आरोग्याची काळजी घ्या. नाही तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. या काळात तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. अशा स्थितीत योग्य आहार घ्या. या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांसोबत एकत्र काम करावं लागेल. तरच तुम्ही तुमचं टार्गेट वेळेवर पूर्ण करू शकाल. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासातली आवड आठवड्याच्या उत्तरार्धात कमी होऊ शकते. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नका, नाही तर कर्ज होईल. या आठवड्यात वाहन सावधपणे चालवावं. नाही तर इजा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सामान्य असतील. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.Lucky Color : Silver Lucky Number : 4
advertisement
5/12
सिंह (Leo) :  सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. या काळात करिअर आणि व्यवसायातून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे दीर्घ काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकतं. एखाद्या समस्येमुळे तुमच्या प्रियजनांशी तुमचे संबंध बिघडले असतील तर ज्येष्ठांच्या मदतीने सर्व गैरसमज दूर होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधितांनी पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. जोखमीची गुंतवणूकही टाळली पाहिजे. या आठवड्यात गृहिणींवर कामाचा अधिक बोजा राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटाल. या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Red Lucky Number : 5
advertisement
6/12
कन्या (Virgo) :  कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कामात व्यग्र असाल. परिणामी प्रियजनांसाठी जास्त वेळ काढता येणार नाही. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात थोडी जास्त धावपळ करावी लागेल. काम करणाऱ्यांवरदेखील कामाचा दबाव असेल. जमिनी आणि मालमत्तेसंबंधीचे वाद कोर्टात नेण्याऐवजी वाटाघाटीतून सोडवणं योग्य ठरेल. सुरुवातीच्या तुलनेत आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. या काळात कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कमिशन आणि मार्केटिंगशी संबंधितांसाठी हा आठवडा प्रतिकूल असेल. नेटवर्क आणि प्रयत्न वाढवल्यास अपेक्षित यश मिळेल. एखाद्या आजाराने त्रस्त असलेल्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. लव्ह पार्टनरशी एखाद्या मुद्द्यावरून वाद झाला असेल तर मित्राच्या मदतीने गैरसमज दूर होतील आणि तुमचे प्रेमसंबंध घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Blue Lucky Number : 10
advertisement
7/12
तूळ (Libra) :  तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा शुभ आहे. परदेशात करिअर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. खूप दिवसांपासून जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार करत असाल, तर या आठवड्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. डॉक्टर, फिजिशियन्स, वकील, सल्लागार आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. विद्यार्थी, तरुण आणि बेरोजगारांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने नवी दिशा मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. रिलेशनशिपचं लग्नात रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर मार्गातले सर्व अडथळे दूर होतील. तुमचे कुटुंबीय लग्नासाठी होकार देतील. कुटुंबातले सदस्य आणि जोडीदार यांच्यात प्रेम आणि सौहार्द राहील.Lucky Color : Green Lucky Number : 2
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात तात्पुरत्या फायद्याच्या बदल्यात दीर्घकालीन नुकसान टाळावं. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाबाबत अधिक घाई-गडबड होईल. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून खूप सावध राहावं लागेल. ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबाशी संबंधित एखादी समस्या तुमच्या चिंतेचं कारण बनू शकते. घर किंवा कामाच्या ठिकाणाशी संबंधित एखादी अडचण परस्पर चर्चेद्वारे सोडवणं योग्य ठरेल. कोणावरही खोटे आरोप किंवा टीका करणं टाळा. नाही तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी पल्ल्याच्या प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडं काळजीत असाल. तुम्हाला तुमच्याही आरोग्याची चांगली काळजी घ्यावी लागेल.Lucky Color : Grey Lucky Number : 15
advertisement
9/12
धनू (Sagittarius) :  हा आठवडा धनू राशीच्या व्यक्तींना खूप आनंद आणि लाभ देईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित प्रयत्नांमध्ये मोठं यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. तुम्ही खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. व्यावसायिक असलेल्यांची व्यवसाय वाढवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. यामध्ये नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. राजकारणाशी संबंधितांना समाजात असलेला आदर वाढेल. त्यांना अपेक्षित पद किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Yellow Lucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) :  मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सुखसमृद्धीचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला आश्चर्यकारक उत्साह आणि आत्मविश्वासदेखील पहायला मिळेल. तुम्ही पूर्वी घेतलेल्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे या आठवड्यात आनंददायी परिणाम मिळतील. बढती किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन कल्पना आणि प्रस्ताव मिळतील. व्यवसायात वाढ होईल. त्यामुळे तुम्हाला त्याबाबत अधिक आवड निर्माण होईल. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेच्या तयारीत व्यग्र असाल आणि तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरदार महिलांच्या आयुष्यातले अडथळे दूर होतील. त्यांना घर आणि कुटुंबासह कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.Lucky Color : Pink Lucky Number : 6
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गेल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा अधिक शुभ आणि भाग्याचा असेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात दीर्घ काळापासून सुरू असलेली एखादी मोठी समस्या सुटू शकते. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि तुम्हाला त्यातून फायदा होईल. या आठवड्यात तुमचा मान-सन्मान लक्षणीय वाढेल. घर असो किंवा समाज, सर्व ठिकाणी लोक तुमचं म्हणणं गांभीर्याने ऐकतील. कोर्टात एखादं प्रकरण सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात सरकारशी संबंधित काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल. तुम्हाला भविष्यात काही फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. उच्च शिक्षणातले अडथळे दूर होतील. सिंगल असलेल्यांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल. आधीच प्रेमात असलेल्यांचे संबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color : Black Lucky Number : 10
advertisement
12/12
मीन (Pisces) :  मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेम, पैसे आणि प्रगतीच्या दृष्टीने अतिशय शुभ असेल. जर तुम्ही व्यवसायात असाल आणि तुमचे पैसे मार्केटमध्ये अडकले असतील तर ते या आठवड्यात अनपेक्षितपणे मिळतील. नोकरदारांनाही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. मैत्रिणीच्या मदतीने इच्छित ठिकाणी नोकरी किंवा कंत्राट मिळवण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील आणि स्थावर मालमत्तेत वाढ होईल. कुटुंबाबाबत तुम्ही घेतलेल्या निर्णयांचं सर्व जण कौतुक करतील. लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक लांब किंवा कमी पल्ल्याच्या प्रवास घडण्याची शक्यता आहे. या काळात सरकारशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंध निर्माण होतील. किरकोळ समस्या सोडल्या तर एकूण आरोग्य सामान्य राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदाराशी सुसंवाद वाढेल. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : Orange Lucky Number : 8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Rashi Bhavishya In Marathi: आठवड्यात अनेक शुभ योग! फेब्रुवारीचा शेवट कोणासाठी कसा? साप्ताहिक राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल