March Horoscope: रविप्रदोषावर सुरू होणारा मार्च महिना कोणासाठी लकी? मेष ते मीन मासिक राशीभविष्य
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
March 2026 Horoscope: रविप्रदोषावर मार्च महिना सुरू होत आहे. मार्च महिना बहुतेक राशींसाठी संमिश्र फळ देणारा ठरेल. या महिन्यात यश मिळवण्यासाठी कष्ट, संयम आणि योग्य निर्णयांची जोड द्यावी लागेल. महिन्याची सुरुवात अनेकांसाठी छान असेल, ज्यामध्ये कुटुंब आणि मित्रांची साथ लाभेल. करिअरमध्ये नवीन संधी आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी कामात प्रगती आणि प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वृषभ, कर्क, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना सुरुवातीला आरोग्य, खर्च आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सर्व 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/12

मेष - मेष राशीसाठी मार्च महिना संमिश्र असेल. महिन्याची सुरुवात आनंदात होईल आणि घरच्यांची तसेच परदेशात असलेल्या लोकांची चांगली साथ मिळेल. व्यवसायात तुम्हाला हवा तसा नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, पण या काळात तुमच्यातला अहंकार वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या आठवड्यात ऑफिसमधील विरोधकांपासून सावध राहा आणि आपली कामं दुसऱ्यावर सोपवण्याची चूक करू नका. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास थकवणारे असले तरी फायदेशीर ठरतील. महिन्याच्या मध्यात मुलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या काळजीने मन थोडे अस्वस्थ राहील, पण लवकरच हे प्रश्न सुटतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील, फक्त घाईत निर्णय घेऊ नका. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराशी संवाद ठेवा. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
advertisement
2/12
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना मार्चच्या सुरुवातीला आरोग्य आणि नात्यांकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. जुने आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात. घरामध्ये एखाद्या सदस्याशी वाद झाल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसायात स्पर्धेचा मोठा सामना करावा लागेल, पण दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने घरगुती वाद मिटतील. करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. महिन्याच्या मध्यात नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, पण तरीही तुमचं समाधान होणार नाही आणि तुम्ही अजून प्रगती करण्यासाठी धडपडाल. विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकतं. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका आणि दबावाखाली कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. महिन्याचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा जास्त चांगला आणि फायदेशीर असेल. प्रेमसंबंधात मात्र जोडीदाराच्या भावनांचा मान राखा, अन्यथा दुरावा वाढू शकतो.
advertisement
3/12
मिथुन - मिथुन राशीसाठी मार्च महिना नवीन संधी आणि नवीन आव्हाने घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीला कामासाठी छोटे किंवा मोठे प्रवास करावे लागतील, जे फायदेशीर ठरतील. वेळेचं आणि ऊर्जेचं नियोजन नीट केलंत तर यश नक्की मिळेल. घरात धार्मिक कार्ये होतील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. पर्यटनाचे योगही आहेत. पण विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकतं. दुसऱ्या आठवड्यात विरोधक कामात अडथळे आणतील, पण तुम्ही तुमच्या बुद्धीने त्यावर मात कराल. महिन्याच्या मध्यात कामाचा व्याप खूप वाढेल आणि कष्टाच्या मानाने फळ थोडे कमी मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. महिन्याचा उत्तरार्ध मात्र खूप अनुकूल असेल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि विविध मार्गांनी पैसा येईल. प्रेमसंबंधांसाठी सुरुवातीचा काळ चांगला आहे, पण मधल्या काळात काही कारणांमुळे जोडीदाराशी भेट होऊ शकणार नाही. हाडं आणि पोटाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
4/12
कर्क - कर्क राशीसाठी मार्चची सुरुवात थोडी आव्हानात्मक असेल. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची ओढाताण होईल आणि मदतीसाठी कोणाकडे बघण्यापेक्षा स्वतःलाच सगळं हाताळावं लागेल. सुरुवातीला अडचणी असल्या तरी तुम्ही तुमच्या चातुर्याने त्या सोडवाल. महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. या काळात आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा थोडा कमी नफा मिळेल, पण प्रगती सुरू राहील. उत्तरार्ध मात्र खूप फायदेशीर असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. राजकारणातील लोकांना मोठे पद किंवा मान मिळू शकतो. परदेशात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. प्रेमसंबंधांतील सुरुवातीचे गैरसमज दूर होऊन जोडीदारासोबतचा विश्वास वाढेल. वैवाहिक जोडीदारासोबत तीर्थयात्रेचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील.
advertisement
5/12
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यात पैसा आणि वेळ यांचा खूप विचारपूर्वक वापर करावा. घराची किंवा वाहनाची दुरुस्ती आणि इतर गरजांमुळे खर्च वाढून बजेट बिघडू शकतं. आरोग्याची विशेष काळजी घ्या, जुने आजार त्रास देऊ शकतात. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. या काळात घरगुती समस्यांमुळे मन थोडे चिंतेत असेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, योग्य वेळेची वाट पाहा. व्यवसायात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. महिन्याच्या मध्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर जवळची माणसं दुखावून तुम्हाला सोडून जातील. वाद टाळा, कारण रागामुळे बनलेली कामं बिघडू शकतात. उत्तरार्धात मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जोडीदार कठीण काळात तुमची भक्कम साथ देईल.
advertisement
6/12
कन्या - कन्या राशीसाठी मार्च महिना चांगला जाईल, पण आपल्या महत्त्वाकांक्षांवर ताबा ठेवावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जादा वेळ द्यावा लागेल. करिअर किंवा व्यवसायाबाबत मोठा निर्णय घेताना सावध राहा. तुमचे बेत पूर्ण झाल्याशिवाय कोणाकडेही उघड करू नका, कारण विरोधक टपून बसलेले असतील. दुसऱ्या आठवड्यात अचानक मोठे खर्च समोर येतील, त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या मध्यात तुमच्या वागण्यामुळे लोक तुमची थट्टा करू शकतात, ज्यामुळे जवळच्या व्यक्ती दुरावतील. पण उत्तरार्ध मात्र तुमच्या बाजूने असेल. ठरलेली कामं वेळेवर पूर्ण होतील आणि व्यवसायात हवा तसा नफा मिळेल. प्रेमसंबंधात घरातील लोकांशी वाद होऊ शकतात किंवा तुमची बदनामी होऊ शकते, त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक आयुष्यात गोडवा टिकून राहील.
advertisement
7/12
तूळ - तूळ राशीसाठी मार्च महिना सुख आणि भाग्याचा असेल. प्रत्येक पावलावर मित्रांची साथ लाभेल आणि नियोजित कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला एखादं मोठं यश मिळेल, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. दुसऱ्या आठवड्यात कामात थोडे अडथळे येतील, पण ते लवकरच दूर होतील. व्यवसायाची गती थोडी मंद असली तरी नफा होत राहील. परदेशी व्यापारात असलेल्या लोकांना महिन्याच्या मध्यात मोठे यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बचतीमध्ये वाढ होईल. आर्थिक फायदा होत असतानाच चैनीच्या वस्तूंवरही खर्च होईल. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. राजकारणातील लोकांना हवं ते पद मिळेल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना खूप शुभ आहे. लग्नाचे बोलणे पुढे सरकेल आणि वैवाहिक सुख मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
advertisement
8/12
वृश्चिक - वृश्चिक राशीसाठी मार्च महिना अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. रखडलेली कामं पूर्ण होऊन महिन्याची सुरुवात होईल. सरकारी कामात यश मिळेल आणि आर्थिक फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याची हीच योग्य वेळ आहे. कुटुंबाचा आणि मित्रांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. दुसऱ्या आठवड्यात थोडे अडथळे आले तरी तुम्ही डगमगणार नाही. मार्केटिंग क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी महिन्याचा मध्य खूप फायदेशीर असेल. उत्तरार्धात तुमच्या बुद्धीमुळे तुम्हाला मान-सन्मान आणि पैसा मिळेल. घरात एखादं मंगल कार्य ठरेल आणि आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधात जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. एखादं सरप्राईज गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य सुखाचं असेल आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहील.
advertisement
9/12
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी मार्चची सुरुवात यश घेऊन येईल. करिअर किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठी ऑफर मिळू शकते. तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही समाजात आपली वेगळी ओळख निर्माण कराल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे भविष्यात मोठ्या प्रोजेक्टशी जोडले जाण्याची संधी मिळेल. दुसऱ्या आठवड्यात मात्र विरोधकांपासून सावध राहा, ते तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवावी. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. महिन्याच्या मध्यात परिस्थिती पुन्हा तुमच्या बाजूने येईल आणि नोकरीत बढतीचे योग येतील. तुमचं नशीब सूर्यासारखं चमकेल. फक्त चौथ्या आठवड्यात घाईत गाडी चालवू नका, दुखापत होण्याची शक्यता आहे. नवीन मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं. जोडीदारासोबत तीर्थयात्रेचे योग आहेत.
advertisement
10/12
मकर - मकर राशीसाठी मार्च महिना सुख-दुःखाचा संमिश्र अनुभव देईल. सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे थोडी चिंता वाटेल. कामाच्या ठिकाणी काही बदल होतील, ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जवळच्या मित्रांच्या मदतीने तुम्ही आव्हानांवर मात कराल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चढ-उतारांचा असेल, अचानक आलेल्या मोठ्या खर्चामुळे बजेट कोलमडू शकतं. दुसऱ्या आठवड्यात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल, जो फायदेशीर ठरेल. जमिनीचे वाद एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने सुटतील. महिन्याच्या मध्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागेल. गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तरार्धात यश मिळेल. घरात एखादी चैनीची वस्तू येईल, ज्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात, अफवांवर विश्वास न ठेवता जोडीदाराशी संवाद साधा. वैवाहिक नातं मधुर राहील.
advertisement
11/12
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना संमिश्र असेल. सुरुवातीला ऑफिसमधील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. तुमच्या रागीट वागण्यामुळे जवळची माणसं दुरावू शकतात, त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा. दुसऱ्या आठवड्यात कामाचा ताण वाढेल आणि प्रवास थकवणारे होतील. कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. महिन्याच्या मध्यात अचानक मोठं यश मिळण्याचे योग आहेत. एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जमीन खरेदी-विक्रीतून लाभ होईल आणि व्यवसायात हवा तसा नफा मिळेल. उत्तरार्धात एखादी मोठी समस्या सुटल्यामुळे मोकळा श्वास घेता येईल. वडिलांची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंधांतील जुने वाद मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक आयुष्य सुखी असेल आणि जोडीदार प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहील. आरोग्य सामान्य राहील.
advertisement
12/12
मीन - मीन राशीसाठी मार्च महिना चढ-उतारांचा असेल. करिअर आणि व्यवसायात सुरुवातीला आव्हाने येतील, पण जवळचे लोक तुमच्या मदतीला उभे राहतील. सहकाऱ्यांच्या मदतीने कामं वेळेत पूर्ण होतील. जमिनीच्या वादांमुळे मन चिंतेत राहील आणि प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यशासाठी जादा कष्ट घ्यावे लागतील. दुसऱ्या आठवड्यात थोडा दिलासा मिळेल आणि अडचणी कमी होतील. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. महिन्याच्या मध्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. कुटुंबात एखाद्या विषयावरून वाद होऊ शकतात, जो सोडवण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे अस्वस्थता जाणवेल. प्रेमसंबंध टिकवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा मान ठेवा आणि स्वतःहून पुढाकार घेऊन गैरसमज दूर करा. जोडीदारासाठी वेळ काढणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
March Horoscope: रविप्रदोषावर सुरू होणारा मार्च महिना कोणासाठी लकी? मेष ते मीन मासिक राशीभविष्य