नवऱ्यापेक्षा 3 पट गर्भश्रीमंत, प्रेमात इतकी वेडी की लग्नासाठी धर्म बदलला; कोण आहे थलापथी विजयची बायको संगिता?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Who is Thalapathy Vijay's wife Sangita: विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पण या वादाच्या केंद्रस्थानी असलेली संगीता नेमकी आहे तरी कोण?
advertisement
1/11

ज्याला तामिळनाडूमध्ये लोक आपला देव मानतात, त्या थलापथी विजयच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या एकामागून एक धक्के बसत आहेत. गेली दोन वर्षे ज्या बातम्या केवळ गॉसिप म्हणून दबक्या आवाजात चर्चिल्या जात होत्या, त्या आता सत्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या आहेत.
advertisement
2/11
विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतल्याने सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पण या वादाच्या केंद्रस्थानी असलेली संगीता नेमकी आहे तरी कोण?
advertisement
3/11
संगीता आणि विजय यांची प्रेमकथा एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या स्क्रीप्टपेक्षा कमी नाही. संगीता ही मूळची श्रीलंकन तमिळ असून तिचे वडील ब्रिटनमधील एक मोठे उद्योगपती आहेत.
advertisement
4/11
संगीताचा जन्म आणि शिक्षण लंडनमध्येच झाले. १९९६ मध्ये विजयचा 'पुवे उनक्कगा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संगीता त्याची कट्टर फॅन बनली.
advertisement
5/11
आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी संगीता लंडनहून थेट चेन्नईला आली. तिथल्या एका शूटिंग सेटवर तिने विजयची भेट घेतली आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं. तिची ही निष्पाप दाद आणि नम्रता विजयला इतकी भावली की त्याने तिला आपल्या घरी जेवायला बोलावलं.
advertisement
6/11
तिथे विजयच्या आई-वडिलांनाही ती आवडली आणि २५ ऑगस्ट १९९९ रोजी या दोघांचा शाही विवाह संपन्न झाला. विजय आणि संगीता यांनी २५ वर्षांचा संसार केला. त्यांना जॅसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुलेही आहेत.
advertisement
7/11
पण गेल्या दोन वर्षांपासून या नात्यात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चा होत्या. संगीताने घटस्फोटाच्या अर्जात विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळ यांसारखे गंभीर आरोप केल्याचे वृत्त आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असलेल्या कथित संबंधांमुळे हे नातं मोडकळीस आल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
8/11
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं गेल्या दोन वर्षांपासून स्वतंत्र राहत आहे. संगीता गेल्या वर्षभरात विजयच्या राजकीय सभांना किंवा कौटुंबिक सोहळ्यांनाही उपस्थित नसल्याने संशयाची पाल चुकचुकली होती.
advertisement
9/11
आता २० एप्रिल रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार असून, विजयला स्वतः कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
advertisement
10/11
संगीता सोर्णलिंगम ही जरी एका सुपरस्टारची पत्नी असली, तरी तिने स्वतःला ग्लॅमरच्या जगापासून नेहमीच लांब ठेवलं. तिचे वडील ब्रिटनमधील मोठे प्रस्थ असल्याने संगीताची वैयक्तिक संपत्ती सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचं बोललं जातं.
advertisement
11/11
इतकी श्रीमंती असूनही ती नेहमीच साध्या राहणीसाठी ओळखली जायची. २०१९ मध्ये तिला 'अनहेरल्डेड कमांडर' या पुरस्काराने गौरवण्यात आले होते, जे तिच्या पडद्यामागील खंबीर समर्थनाचे प्रतीक होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नवऱ्यापेक्षा 3 पट गर्भश्रीमंत, प्रेमात इतकी वेडी की लग्नासाठी धर्म बदलला; कोण आहे थलापथी विजयची बायको संगिता?