Wolf Moon Purnima 2026: याच पौर्णिमेला वुल्फ मून दिसणार; वर्षातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन, या राशींना गुडन्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Wolf Moon Purnima 2026: नवीन वर्षातील पहिला पूर्ण चंद्र म्हणजेच वुल्फ मून शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री, म्हणजेच 3 जानेवारी रोजी आकाशात दिसणार आहे. या काळात चंद्र इतर पौर्णिमेपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसेल. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जानेवारी महिन्यातील पौर्णिमेला वुल्फ मून असे संबोधले जाते.
advertisement
1/5

प्राचीन काळी कडाक्याच्या थंडीत लांडग्यांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येत असत, त्यामुळे या पौर्णिमेला लांडग्यावरून वुल्फ मून हे नाव देण्यात आले. या काळात चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आणि मिथुन राशीत स्थित असेल. चंद्राची ही स्थिती तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
advertisement
2/5
वृषभ रास: वुल्फ मून वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक भक्कम करेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढीचे संकेत मिळत आहेत. व्यवसायात मोठा नफा होईल आणि केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
advertisement
3/5
सिंह रास: सिंह राशीच्या लोकांसाठी वुल्फ मून करिअर आणि कमाई या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट ठरेल. तुम्हाला कुठूनतरी मोठी संधी किंवा ऑफर मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांचा एखादा मोठा सौदा या काळात पूर्ण होऊ शकतो शिवाय अचानक धनलाभाचे योग आहेत.
advertisement
4/5
धनु रास: धनु राशीच्या लोकांसाठी वुल्फ मून नशिबाची दारे उघडणारा ठरेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन योजनांमधून चांगली कमाई होईल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल.
advertisement
5/5
वुल्फ मून कसा पाहता येईल - वुल्फ मून उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येईल कारण चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा आकार मोठा दिसेल. दुर्बीण किंवा कोणत्याही खगोलशास्त्रीय उपकरणाने पाहिल्यास चंद्राचे हे रूप अधिक सुंदर आणि स्पष्ट दिसेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Wolf Moon Purnima 2026: याच पौर्णिमेला वुल्फ मून दिसणार; वर्षातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन, या राशींना गुडन्यूज