TRENDING:

100 वर्षांनी अद्भूत योग, आयुष्यात येणार आनंद, करिअरमध्येही मिळणार यश, 3 राशीच्या लोकांची चांदी

Last Updated:
सनातन धर्मात गंगा दसऱ्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शंकराच्या जटांमधून गंगा धरतीवर अवतरली होती. याच वर्षी गंगा दसरा हा ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जाईल. या वर्षी गंगा दसऱ्याच्या दिवशी अद्भुत योग तयार होणार आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर पडणार आहे. याच संयोगामुळे काही राशीच्या लोकांवर गंगा मातेची विशेष कृपा होणार आहे. (परमजीत कुमार/देवघर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
100 वर्षांनी अद्भूत योग, आयुष्यात येणार आनंद, करिअरमध्येही मिळणार यश, 3...
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, यावर्षी 16 जूनला हा गंगा दसरा साजरा केला जाईल. या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, रवि योग आणि हस्त नक्षत्र तयार होणार आहे. हा योग 12 राशींमध्ये 3 राशीच्या लोकांचे नशिबच बदलणार आहे. याचा विशेष प्रभाव पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/5
मेष : या राशीच्या लोकांसाठी गंगा दसरा हा विशेष असा राहणार आहे. करिअर-व्यवसायात प्रगती होणार आहे. नवीन लोकांशी भेट होईल. व्यापारात उंची साधाल. आर्थिक फायदा होईल. घरबसल्या एखादी आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
3/5
मिथुन : नशिब सोबत असल्याने प्रत्येक कार्यात यश मिळेल. नोकरीत प्रगती किंवा पदोन्नतीचा योग आहे. कामामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. आध्यात्मिक कार्यात रुचि वाढणार आहे. आपल्या जीवनसाथीसोबत आध्यात्मिक यात्रेवर जाऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
4/5
कुंभ : शनिच्या शश राजयोगात वृद्धीमुळे साडेसातीचा प्रभाव कमी होईल. थांबलेले कोणतेही कार्य पूर्ण होण्याची शक्यता. नोकरीत नवीन संधी मिळतील. आयुष्यात आनंद निर्माण होईल. आर्थिक फायदाही होणार आहे. कुटुंबासह आनंदी वेळ जाईल.
advertisement
5/5
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
100 वर्षांनी अद्भूत योग, आयुष्यात येणार आनंद, करिअरमध्येही मिळणार यश, 3 राशीच्या लोकांची चांदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल