TRENDING:

Bajaj फक्त नाव पुरे! आणली सगळ्यात स्वस्त आणि मस्त स्कूटर, फिचर्स सगळ्यात भारी!

Last Updated:
भारतात सध्या ईलेक्ट्रिक स्कुटर खरेदी घेण्याकडे चांगलाच कल वाढला आहे. हेच लक्षात घेऊन Bajaj ने आपली नवीन Chetak 3503 लाँच केली आहे.
advertisement
1/7
Bajaj फक्त नाव पुरे! आणली सगळ्यात स्वस्त आणि मस्त स्कूटर, फिचर्स सगळ्यात भारी!
भारतात सध्या ईलेक्ट्रिक स्कुटर खरेदी घेण्याकडे चांगलाच कल वाढला आहे. हेच लक्षात घेऊन Bajaj ने आपली नवीन Chetak 3503 लाँच केली आहे. चेतकचं हे नवं व्हेरिएंट आहे. बजाजची आतापर्यंतची ही सर्वात स्वस्त अशी स्कुटर ठरली आहे.  ही स्कुटर Chetak 3501 पेक्षा २० हजार रुपयांनी स्वस्त आहे.
advertisement
2/7
Chetak 3503 मध्ये चेसीस आणि बॅटरीचा सेटअप बदलला आहे. हे महागड्या व्हेरिएंटमध्ये पाहण्यास मिळतं. पण काही फिचर्स हे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या स्कुटरची किंमत कमी झाली. या स्कुटरमध्ये सीट खाली ३५ लीटर इतका स्टोरेज स्पेस मिळतोय. डिझाइनमध्ये कोणतीही मोठे बदल केले नाही. 
advertisement
3/7
Bajaj ने चेतक 35 सीरीजमध्ये 3 व्हेरिएंट लाँच केले आहे. सगळ्यात स्वस्त व्हेरिएंट Chetak 3503 आहे. या स्कुटरची एक्स शोरुम किंमत 1,09,500 रुपये  आहे. यानंतर Chetak 3502 ची किंमत 1,22,499 रुपये  आहे., तर सर्वात महाग ही Chetak 3501 असून तिची किंमत 1,29,743 रुपये आहे.
advertisement
4/7
Chetak 3503 मध्ये 3.5kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. एकदा  फुल चार्ज केल्यावर 155 किमी रेंज मिळेल.  या स्कुटरचा टॉप स्पीड ६३ किमी इतका आहे. ही स्कुटर शहरात चालवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. 
advertisement
5/7
या स्कुटरमध्ये बेसिक  ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि कलर LCD डिस्प्ले दिला आहे.  बॅटरी 0 ते 80 चार्ज होण्यासाठी ३ तास २५ मिनिटं लागतात. जे इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त आहे. या स्कुटरमध्ये ड्रम ब्रेक्स दिले आहे.  डिस्क ब्रेकचा पर्याय काढून टाकला आहे. 
advertisement
6/7
यासोबत सीक्वेंशियल इंडिकेटर आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखे फिचर्स दिले आहे. यामध्ये २ रायडिंग मोड दिले आहे एक आहे  आणि स्पोर्ट्स. यासोबत हिल-होल्ड असिस्ट आणि फुल मेटल बॉडी सारखे स्मार्ट फिचर्स दिले आहे. 
advertisement
7/7
Chetak 3503 मध्ये  कंपनीने ४ रंग उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक, सायबर व्हाइट आणि मेट ग्रे दिला आहे. या स्कुटरची बुकिंग बजाजच्या संकेतस्थळावर जाऊन करू शकता किंवा जवळील बजाजच्या डिलरशीपमध्ये जाऊनही बूक करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bajaj फक्त नाव पुरे! आणली सगळ्यात स्वस्त आणि मस्त स्कूटर, फिचर्स सगळ्यात भारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल