TRENDING:

SBI वरुन 6 लाखांचं कार लोन घेतल्यावर मंथली EMI किती येईल? व्याज किती? घ्या जाणून

Last Updated:
Car Loan From SBI: तुम्ही SBI कडून कारसाठी 6 लाख रुपयांचे ऑटो लोन घेत असाल तर जाणून घ्या मासिक EMI किती असेल.
advertisement
1/6
SBI वरुन 6 लाखांचं कार लोन घेतल्यावर मंथली EMI किती येईल? व्याज किती? घ्या जाणून
नवी दिल्ली : देशात सण-उत्सव सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत वाहनांवर अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्ही कर्जावर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कार कंपन्यांनी दिलेल्या अनेक ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
advertisement
2/6
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI 9.15 टक्के दराने वाहन कर्ज देत आहे. तुम्ही SBI कडून 6 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास तुम्हाला किती मासिक EMI भरावे लागेल ते जाणून घेऊया.
advertisement
3/6
सध्या, एसबीआयमध्ये 9.15% च्या सुरुवातीच्या व्याज दराने वाहन कर्ज उपलब्ध आहे. तुमचा CIBIL स्कोअर 800 किंवा त्याहून अधिक असेल तरच तुम्हाला या प्रारंभिक व्याजदरावर वाहन कर्ज मिळेल.
advertisement
4/6
या स्कोअरवर बँक तुमचे वाहन कर्ज सहज मंजूर करेल. तुमचा CIBIL स्कोर कमी असल्यास, तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल.
advertisement
5/6
तुमचे 6,00,000 रुपयांचे कार कर्ज SBI कडून 9.15% दराने मंजूर झाले असेल आणि कर्जाचा कालावधी 3 वर्षांसाठी ठेवला असेल, तर SBI EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमचा मासिक EMI 19,122 रुपये असेल.
advertisement
6/6
कॅल्क्युलेशननुसार, तुम्ही कर्जाच्या कालावधीसाठी 88,383 रुपये व्याज द्याल. म्हणजे तीन वर्षांनंतर तुम्हाला एकूण 6,88,383 रुपये द्यावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
SBI वरुन 6 लाखांचं कार लोन घेतल्यावर मंथली EMI किती येईल? व्याज किती? घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल