TRENDING:

EV मार्केटमध्ये धमाका! XEV 9S ने Nexon सह Windsor ला चारली धूळ, विक्रीत ठरली अव्वल

Last Updated:
सध्या भारतात ईलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. लोकं पेट्रोल-डिझेल वाहनं सोडून पर्यावरण पूरक असणाऱ्या ईव्ही वाहनांची निवड करत आहे. दरम्यान ईलेक्ट्रिक मार्केटमध्ये नुकताच एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
advertisement
1/8
EV मार्केटमध्ये धमाका! XEV 9S ने Nexon सह Windsor ला चारली धूळ, विक्रीत ठरली अव्वल
महिंद्राची XEV 9S ने इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये ही कार लॉन्च झाली होती. दरम्यान आता महिनाभरातच ही 5 सीटर इलेक्ट्रिक कार 3,539 यूनिट्सच्या विक्रीसह देशातील सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही बनलीये. या ईव्हीने टाटासह एमजीसारख्या मोठ्या कंपन्यांना पराभवाची धूळ चारत पहिला क्रमांक गाठलाय.
advertisement
2/8
MG Motor च्या या प्रीमियम क्रॉसओव्हर विंडसर ईव्हीने आपली मजबुती कायम ठेवलीये. फेब्रवारीमध्ये या कारचे 2,599 यूनिट्स विकले. या आकड्यासह ही यूव्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली. ही कार तिच्या शानदार 'एयरो-लाउंज' सीट्स आणि बॅटरी-एज-ए-सर्व्हिस (BaaS) मॉडलमुळे ग्राहकांच्या आवडीची बनलीये.
advertisement
3/8
टाटा नेक्सन EV ही दीर्घकाळापासून मार्केटमध्ये आघाडीवर होती. जी आत तिसऱ्या नंबरवर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या कारचे 2,410 यूनिट्स विकले. तसं पाहिलं तरं, नेक्सन अजुनही एक विश्वासार्ह नाव आहे. मात्र महिंद्रा आणि एमजीच्या नव्या गाड्यांनी याच्या मार्केट शेअरला टक्कर दिलीये.
advertisement
4/8
महिंद्राची दुसरी प्रीमियम कार XEV 9e ही टॉपवर आहे. या कारने 1,889 यूनिट्सच्या विक्रीसह चौथा क्रमांक मिळवलाय. लग्जरी फीचर्स आणि फ्यूचरिस्टिक डिझाइनमुळे ती अशा ग्राहकांना आकर्षित करतेय ज्यांना हाय-टेक ड्रायव्हिंग अनुभव हवाय.
advertisement
5/8
टाटाची दमदार हॅरेयिर ईव्ही ही पाचव्या नंबरवर आहे. फेब्रुवारीमध्ये या कारची विक्री चांगली राहिली. प्रिमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये या कारने स्थान निर्माण केले. टाटा मोटर्सने या कारला मोठ्या बॅटरी पॅक आणि ऑल-व्हील ड्राइव्हसारख्यी फीचर्ससह मार्केटमध्ये आणलंय.
advertisement
6/8
टाटा मोटर्सच्या परवडणाऱ्या रेंजमध्ये येणाऱ्या टायागो ईव्ही आणि पंच ईव्ही या क्रमशः सातव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. टियागो ईव्हीचे 1,226 यूनिट्स आणि पंच EV चे 1,061 यूनिट्स विकलेय. ज्या लोकांना शहरात वापरासाठी लहान ईव्ही हवीये, त्यांच्यासाठी हे दोन्ही मॉडल बेस्ट ठरताय.
advertisement
7/8
महिंद्राच्या स्पोर्ट्स इलेक्ट्रिक कार BE 6नेही टॉप 10 मध्ये जागा मिळवलीये. फेब्रुवारीमध्ये या कारचे 1,104 यूनिट्स विकले. ज्यामुळे ही यादीत आठव्या नंबरवर होती. या कारच्या शार्प लूक्स आणि परफॉर्मेंसमुळे तरुणांमध्ये या कारची खुप मागणी आहे.
advertisement
8/8
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही ईव्ही सेगमेंटमध्ये दमदार उपस्थिती नोंदवलीये. या कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार असलेल्या ई-विटाराने 870 यूनिट्सच्या विक्रीसह 10 वा क्रमांक मिळवलाय. मारुतीच्या एंट्रीने येत्या काळात स्पर्धा आणखी इंट्रेस्टिंग होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
EV मार्केटमध्ये धमाका! XEV 9S ने Nexon सह Windsor ला चारली धूळ, विक्रीत ठरली अव्वल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल