किती दिवस बसमध्ये धक्के खात ऑफिसला जाणार? दिवाळीत घ्या सगळ्यात स्वस्त Bike, मायलेजही 80 किमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेण्याचा प्लॅन करत असाल आताच ती संधी आहे. कारण, १०० सीसी सेगमेंटमध्ये बाईकच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे.
advertisement
1/7

जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर सगळीकडे स्वस्ताईची लाट आली आहे. वाहन खरेदीसाठी शोरूमला प्रचंड गर्दी आहे. कार आणि दुचाकी, स्कुटर खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी एखादी बाईक विकत घेण्याचा प्लॅन करत असाल आताच ती संधी आहे. कारण, १०० सीसी सेगमेंटमध्ये बाईकच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे. अवघ्या ५५ हजारांमध्ये तुम्ही ७० किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करू शकता.
advertisement
2/7
HERO HF - जर स्वस्त आणि मायलेज किंग बाईकचं बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली येते ती Hero HF Deluxe आणि Hero HF 100. या दोन्ही बाईक सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक आहे. मागील अनेक वर्षांपासून Hero HF Deluxe आणि Hero HF 100 ने मार्केटमध्ये दबदबा कायम राखला आहे.
advertisement
3/7
Hero HF Deluxe बाईकची किंमत 58,739 पासून सुरू होते. ही बाईक 70 kmpl मायलेज देते .तर Hero HF Deluxe ही सगळ्यात स्वस्त बाईक आहे, या बाइकची किंमत 55,992 पासून सुरू होते. मायलेज हे 65 - 70 किमी पर्यंत आहे. Hero च्या सर्वात स्वस्त बाईक्सपैकी आहेत. या बाईकचं मेंटेन्स हे सगळ्यात कमी आहे.
advertisement
4/7
Bajaj Platina 100: भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बजाज यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजाजची Bajaj Platina 100 ही मायलेजच्या बाबतीत किंग आहे. या बाईकचं मायलेज हे तब्बल ७५ ते ८० किमी एका लिटरमध्ये मिळतंय या बाईक किंमत 63,000 पासून सुरू होते. ही बाईक तिच्या उत्कृष्ट मायलेजसाठी खूप प्रसिद्ध आहे. काही रिपोर्ट्सनुसार ती 80 kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईकमध्ये आरामदायक सीटिंग, DTS-i इंजिन, 'ComforTec' तंत्रज्ञान जे खडबडीत रस्त्यांवरही आरामदायी रायडिंग देतं.
advertisement
5/7
TVS Sport: Bajaj Platina प्रमाणेच, TVS Sport देखील उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते आणि 80 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. या बाईकचं मायलेज हे 75 - 80 kmpl पर्यंत आहे. या बाइकची किंमत 62,000 हजारांपासून सुरू होते.
advertisement
6/7
Honda Shine 100: जपानी कंपनी होंडाची Honda Shine 100 हे खूप लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची किंमत 63,525 रुपयांपासून सुरू होते. या बाइक मायलेज हे 65 kmpl पर्यंत आहे. Honda ची सर्वात स्वस्त बाईक, जी Honda च्या विश्वासार्हतेसोबत येते.
advertisement
7/7
Hero Splendor Plus: Hero Splendor ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे आणि तिचे मायलेजही खूप चांगले आहे. मजबूत इंजिन, सहज उपलब्ध स्पेअर पार्ट्स , बाजारात मोठी मागणी आणि चांगली री-सेल व्हॅल्यू. या बाइकची किंमत 73,902 हजारांपासून सुरू होते. या बाइकचं मायलेज हे 65 - 70 kmpl पर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस बसमध्ये धक्के खात ऑफिसला जाणार? दिवाळीत घ्या सगळ्यात स्वस्त Bike, मायलेजही 80 किमी!