देव तारी! सुसाट Hyundai Creta पुलावरून कोसळली, पण 6 जणांना खरचटलं सुद्धा नाही, PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
'देव तारी त्याला कोण मारी', या म्हणीचा प्रत्यय मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात आला आहे. भरधाव हुंदई क्रेटा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला, पण....(प्रसाद पाताडे, प्रतिनिधी)
advertisement
1/7

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात आला आहे. भरधाव हुंदई क्रेटा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला. क्रेटा ६० फूट खोल ओहोळत बुडाली. पण, या अपघातात क्रेटामधील ६ तरुण आश्चर्यकारक बचावले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.
advertisement
2/7
हा भीषण अपघात बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील सहाही युवक आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बांदा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली. माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
3/7
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. भरधाव वेगात असलेली क्रेटा अचानक आऊटऑफ कंट्रोल झाली आणि पुलाच्या कठडा तोडून खाली कोसळली.
advertisement
4/7
सावंतवाडी येथील ६ तरुण या कारने प्रवास करत होते. एमएच ०७ एजी ०००४ क्रमांकाची ही क्रेटा रात्री ओहोळात कोसळली. रात्री पाण्याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने अपघात झाल्याचं लक्षात आलं नाही.
advertisement
5/7
पुलापासून सुमारे १०० मीटर मागे ही कार डिव्हायडरवर चढली आणि प्रचंड वेगाने स्ट्रीट लाईटचा खांब तोडून थेट सुमारे ६० फूट खोल ओहोळात कोसळली. कारमध्ये सावंतवाडी येथील सहा युवक होते. या भीषण अपघातातून हे सर्व युवक सुदैवाने बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली .
advertisement
6/7
गुरुवारी सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
advertisement
7/7
सहाही तरुणांना सकाळी बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर उपचासाठी नजिकच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
देव तारी! सुसाट Hyundai Creta पुलावरून कोसळली, पण 6 जणांना खरचटलं सुद्धा नाही, PHOTOS