TRENDING:

Komaki: बायको काय, मुलंही घरी चालवत आणतील अशी Bike, किंमत फक्त 29,999!

Last Updated:
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची चांगली चलती आहे. एकापेक्षा एक आणि स्वस्तात मस्त अशा कमी किंमतीची ईलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये सहज पाहण्यास मिळत आहे.
advertisement
1/8
Komaki: बायको काय, मुलंही घरी चालवत आणतील अशी Bike, किंमत फक्त 29,999!
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची चांगली चलती आहे. एकापेक्षा एक आणि स्वस्तात मस्त अशा कमी किंमतीची ईलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये सहज पाहण्यास मिळत आहे. अशातच  भारतातील आघाडीच्या ईव्ही उत्पादकांपैकी एक असलेल्या कोमाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने त्यांच्या इलेक्ट्रिक मोपेडची नवीन XR1 मालिका लाँच केली आहे. या मोपेडची किंमत फक्त 29,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
advertisement
2/8
कोमाकी XR1 - कोमाकी XR1 ला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची फास्ट ऊर्जा प्रणाली, जी बॅटरी संपल्यानंतरही रायडरला त्यांचा प्रवास सुरू ठेवण्याची परवानगी देते. हे नवीन फिचर रायडरच्या रेंज चिंतेची समस्या दूर करते आणि परवडणाऱ्या किमतीत एक विश्वासार्ह पर्याय देते.
advertisement
3/8
70 ते 80 किमी रेंज -XR1 एका चार्जवर 70 ते 80 किमी रेंज देते, जी दैनंदिन कामासाठी, ऑफिस प्रवासासाठी आणि दुकानातील साहित्य नेण्यासाठी बेस्ट आहे.  जर बॅटरी संपली तर या मोपेडला पायंडल दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही सायकलीसारखं चालवतं तिला घरी आणू शकता.
advertisement
4/8
कोमाकी XR1- कोमाकी XR1 ही आरामदायक अशीच आहे.  यात मजबूत फ्रेम, शॉक-अ‍ॅबॉर्सिंग सस्पेंशन आणि हाय-ग्रिप टायर्स आहेत. जे सुरक्षित आणि आरामदायी राइड देतात
advertisement
5/8
त्याच्या एर्गोनोमिक ड्युअल सीट्समुळे रायडर आणि बॅकलियॉन दोघांनाही अधिक आराम मिळतो, तर मोठी फ्रंट बास्केट किराणा सामान किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी मदत करते.
advertisement
6/8
आकर्षक, आधुनिक डिझाइन आणि मजबूत बॉडी, XR1 चं आकर्षण आहे.  दैनंदिन कामासाठी तुम्ही या मोपेडचा सहज वापर करू शकता.
advertisement
7/8
हलकी रचना देखील चांगली हाताळणी आणि सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेत योगदान देते, ज्यामुळे ती पर्यावरणाविषयी जागरूक शहरी रहिवाशांसाठी एक स्मार्ट पर्याय आाहे.
advertisement
8/8
XR1 आता सर्व अधिकृत कोमाकी डीलरशिप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Komaki: बायको काय, मुलंही घरी चालवत आणतील अशी Bike, किंमत फक्त 29,999!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल