TRENDING:

आता Bike विकून टाका! दिवाळीला घरी आणा Maruti ची 33 किमी मायलेज देणारी कार, EMI 2000 पासून सुरू

Last Updated:
विशेष म्हणजे, maruti suzuki s-presso ही एक दमदार अशी मायलेज देणारी कार आहे. या कारचं मायलेज हे तब्बल ३२.७३ किमी इतकं आहे.
advertisement
1/8
Bike विकून टाका! घरी आणा Maruti ची 33 किमी मायलेजदार कार, EMI 2000 पासून
जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमती चांगल्याचं कमी झाल्या आहेत. वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. अशातच दिवाळी सण आल्यामुळे कंपन्यांकडून एकापेक्षा एक ऑफर दिल्या जात आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने दिवाळीच्या तोंडावर 1999 EMI ऑफर आणली आहे. यामध्ये मारुतीच्या सगळ्यात स्वस्त अशी Maruti Suzuki S-Presso ही कार 1999 रुपये EMI वर घरी आणण्याची संधी आहे.
advertisement
2/8
जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे maruti suzuki s-presso ची किंमत कमालीची कमी झाली आहे. या कारची किंमत आता ३ लाख ४९ हजार इतकी झाली आहे. हे एक बेस मॉडेल आहे. देशभरात maruti suzuki s-presso ही सगळ्यात स्वस्त कार आहे. त्यामुळेच मारुतीने खास ऑफर दिली आहे. कंपनीने कार खरेदीसाठी फक्त १९९९ रुपये महिना अशी ऑफर आणली आहे.
advertisement
3/8
मारुती सुझुकीची S-Presso ही कार सगळ्यात स्वस्त कार ठरली आहे. या कारची किंमत आता ३.४९ लाख इतकी आली आहे. त्यामुळे या फेस्टिव्हल सिझनमध्ये कंपनीने या कारवर 1999 रुपये EMI ऑफर आणली. जीएसटी कपातीमुळे या कारच्या किंमतीत तब्बल  1.29 लाख रुपये कमी झाले आहे. 
advertisement
4/8
मारुती सुझुकीने दिवाळीच्या तोंडावर ही ऑफर आणली आहे. या कारची किंमत ३.४९ लाख इतकी आहे. कंपनीने १९९९ EMI ऑफरनुसार तुम्हाला कारच्या २० ते ३० टक्के रक्कम डाउनपेमेंट करायची आहे. समजा तुम्ही ९० हजार रुपये डाऊन पेमेंट केली. तर उरलेली रक्कम २.५९ लाख रुपये तुम्हाला EMI ने फेडायचे आहे. यावर तुम्हाला ५ ते ७ वर्षांची फेड मिळेल. त्यामुळे बँकाने दिलेल्या ऑफर आणि सवलतीमुळे EMI हा कमीत कमी २ ते ३ हजारापर्यंत येईल.
advertisement
5/8
मारुती सुझुकीच्या कारसाठी SBI, HDFC Bank आणि ICICI Bank सारख्या बँका 8% ते 10% टक्क्याने कार लोन देत आहे. ही ऑफर मारुती सुझुकीच्या  अल्टो के१०, वॅगनआर आणि सेलेरियो सारख्या एंट्री-लेव्हल कारवर लागू आहे. 
advertisement
6/8
खरंतर जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ज्या ४ मिटरपेक्षा छोट्या कार आहे, त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकीच्या अनेक गाड्यांची किंमत ही मार्केटमधील इतर गाड्यांच्या तुलनेत कमी आहे.
advertisement
7/8
मारुती सुझुकीने आपल्या एंट्री लेव्हल गाड्यांवर २४ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या छोट्या कार खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.
advertisement
8/8
विशेष म्हणजे, maruti suzuki s-presso ही एक दमदार अशी मायलेज देणारी कार आहे. maruti suzuki s-presso पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार २४.७६ किमी प्रति लिटर मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये या कारचं मायलेज हे तब्बल ३२.७३ किमी इतकं आहे. ही सर्वाधिक मायलेज देणारी मारुतीची कार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता Bike विकून टाका! दिवाळीला घरी आणा Maruti ची 33 किमी मायलेज देणारी कार, EMI 2000 पासून सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल