TRENDING:

Mumbai Metro Pillar Collapse: 'देव तारी..' 19 किमी मायलेज देणारी टँकसारखी SUV स्लॅबखाली सापडली, इंजिन फुटलं पण प्रवाशी वाचला

Last Updated:
मुंबईतील मुलुंड इथं मेट्रोचं बांधकामाच्या दरम्यान स्लॅब कोसळला. हा स्लॅब पुलाच्या खालून जाणाऱ्या धावत्या रिक्षा आणि स्कोडा (skoda kushaq) या एसयूव्हीवर कोसळला.
advertisement
1/11
19 किमी मायलेज देणारी SUV स्लॅबखाली सापडली, इंजिन फुटलं पण प्रवाशी वाचला
देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय आज मुंबईतील एका दुर्दैवी घटनेत पाहण्यास मिळाला. मुंबईतील मुलुंड इथं मेट्रोचं बांधकामाच्या दरम्यान स्लॅब कोसळला. हा स्लॅब पुलाच्या खालून जाणाऱ्या धावत्या रिक्षा आणि स्कोडा (skoda kushaq) या एसयूव्हीवर कोसळला. रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर स्कोडा कारमधील प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहे.
advertisement
2/11
मुंबईभर सध्या मेट्रोच्या कामचं काम सुरू आहे. मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर जॉन्सन गार्डनच्या पुढे असलेल्या बसस्टॉपजवळ मेट्रो ४ चं काम सुरू आहे. पुलाच्या बाजूने स्लॅब लावण्यात आले आहे.
advertisement
3/11
पण, अचानक शनिवारी दुपारच्या सुमारात एक भलामोठा स्लॅब कोसळला. स्लॅब हा रिक्षा आणि skoda kushaq या एसयूव्हीवर कोसळला.
advertisement
4/11
skoda kushaq च्या बोनेटवर हा स्लॅब कोसळला होता. पण, या स्लॅबमुळे skoda kushaq च्या इंजिनचा पार चक्काचूर झाला आणि इंजिन फुटलं.
advertisement
5/11
रिक्षावर स्लॅब कोसळल्यामुळे रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेत रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
6/11
skoda kushaq ही एक फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग असलेली एसयूव्ही आहे. त्यामुळे या अपघातात अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने कारमधील सगळे प्रवासी वाचले आहे.
advertisement
7/11
skoda kushaq ही कोलकाता पासिंग असलेली गाडी आहे. या एसयूव्हीमधून दिपा रुहीया (वय ४०) या प्रवास करत होत्या. ४ तासांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातात त्यांना थोडीफार दुखापत झाली होती. पण, नशीब बलवत्तर आणि दणकट अशा एसयूव्हीमुळे दिशा रुहीया या सुखरूप बचावल्या आहे.
advertisement
8/11
skoda kushaq बद्दल बोलायचं झाालं तर या एसयूव्हीची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे, सेफ्टी. या एसयूव्हीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.
advertisement
9/11
skoda kushaq मध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग्ज दिल्या जातात. तसंच या गाडी अतिरिक्त असे २० वेगवेगळे सेफ्टी फिचर्स असून यामध्ये ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), मल्टी-कोलिजन ब्रेकिंग, हिल होल्ड कंट्रोल, TPMS, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, रियर पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा यांचा समावेश आहे.
advertisement
10/11
skoda kushaq च्या इंजिनबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये दोन टर्बोचार्ज्ड ऑप्शन आहे. एक आहे 1.0 TSI (3-सिलेंडर, 999 cc) आहे जे 115 पीएस पॉवर आणि 178 एनएम टॉर्क जनरेट करते. 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह जोडलेले आहे. दुसरे आहे ते 1.5 TSI (4-सिलेंडर, 1498 cc) जे 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करतो.
advertisement
11/11
skoda kushaq च्या मायलेजबद्दल बोलायचं ठरलं तर ही ही एसयूव्ही 19.76 किमी इतकं मायलेज देते. या गाडीची किंमत १०. ९९ लाखांपासून सुरू होते. टॉप मॉडेल हे १८.४९ लाखांपर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mumbai Metro Pillar Collapse: 'देव तारी..' 19 किमी मायलेज देणारी टँकसारखी SUV स्लॅबखाली सापडली, इंजिन फुटलं पण प्रवाशी वाचला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल