TRENDING:

Tata Sierra च्या मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, RTI मध्ये आश्चर्यकारक आकडेवारी उघड

Last Updated:
टाटा मोटर्सच्या शोरूमवर Tata Sierra ला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे. Tata Sierra ही सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. पण, मायलेजच्या बाबतीत बरीच चर्चा रंगली होती.
advertisement
1/10
Tata Sierra च्या मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, RTI मध्ये आश्चर्यकारक आकडेवारी उघड
टाटा मोटर्सने मोठा गाजावाजा करत मागील वर्षी आपली लिजेंड Tata Sierra लाँच केली होती. हटके लूक आणि दमदार परफॉर्मन्समुळे अवघ्या काही महिन्यात Tata Sierra ने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अजूनही टाटा मोटर्सच्या शोरूमवर Tata Sierra ला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहे. Tata Sierra ही सेफ्टीच्या बाबतीत ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. पण, मायलेजच्या बाबतीत बरीच चर्चा रंगली होती. अखेरीस माहितीचा अधिकाराअंतर्गत अर्थात RTI मध्ये Tata Sierra च्या मायलेजबद्दल खरं सत्य समोर आलं आहे.
advertisement
2/10
Tata Sierra ही एक दमदार आणि शानदार अशी एसयूव्ही आहे. टाटा मोटर्सने आपल्या लिजेंड सियाराचं हे नवीन रुप आहे. टाटा मोटर्सने डिझाईन आणि इंजिनमध्ये बदल करून Tata Sierra लाँच केली. पण, मायलेजबद्दल बराच संभ्रम होता. एका माहितीच्या अधिकारामध्ये Tata Sierra च्या मायलेजची अधिकृत माहिती समोर आली आहे.
advertisement
3/10
वाहन वार्ता (Vahan Warta) नावाच्या एका युझर्सने Tata Sierra च्या मायलेजबद्दल आरटीआयमधून माहिती मागवली असता  1.5L TGDi Hyperion Petrol व्हर्जन 13.5 किमी इतकं मायलेज देत असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
advertisement
4/10
Tata Sierra बद्दल  ARAI अर्थात (Automotive Research Association of India) ला भारतीय ऑटोमोटिव्ह संशोधन संस्थेकडून मिळालेल्या  RTI च्या रिपोर्टमध्ये 1.5 लीटर TGDi Hyperion पेट्रोल इंजिन 13.5 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. पण 1.5 लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन 18.8 किमी प्रति लिटर मायलेज देत असल्याचा उल्लेख केला आहे.
advertisement
5/10
विशेष म्हणजे, Tata Sierra चं 1.5 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंटला आतापर्यंत ARAI कडून प्रमाणपत्र मिळालं नाही.  डिझेल इंजिनला 21 नोव्हेंबर 2025 चा ARAI कडून प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. तर, टर्बो पेट्रोल इंजिनला  11 डिसेंबर 2025 ला परवानगी दिली आहे.
advertisement
6/10
विशेष म्हणजे, Tata Sierra च्या मायलेजबद्दल  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.   टाटा मोटर्सने  Tata Sierra 1.5 लिटर हायपरआयन पेट्रोल इंजिन असलेल्या व्हेरियंटची इंदुर इथं NATRAX प्रुव्हिंग ग्राउंडवर सलग 12 तास Tata Sierra ची टेस्ट घेतली.
advertisement
7/10
टाटा मोटर्सने सलग 12तास Tata Sierra चालवली. गाडी कुठेही थांबली नाही. या दरम्यान Tata Sierra चं तब्बल  29.9 किमी प्रति लिटर इतकं मायलेज नोंदवण्यात आलं होतं. या मायलेजची दखल घेतल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली होती.
advertisement
8/10
Tata Sierra ची आता अधिकृत मायलेजची माहिती समोर आली असली तरी विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही. Tata Sierra ची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंपनीने अलीकडे दावा केला आहे की, लाँच झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात ७० हजार बुकिंग झाली. तर अलीकडे आणखी 10 हजार यूनिट्सची डिलिव्हरी झाली आहे. आतापर्यंत Tata Sierra बुकिंगचा आकडा हा 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वेटिंगची मुदत वाढली आहे. 
advertisement
9/10
लवकरच येणार Tata Sierra EV - दरम्यान, एकीकडे टाटा मोटर्सकडून बुक झालेल्या गाड्यांची डिलिव्हरी सुरू आहे. Tata Sierra च्या प्लांटमध्ये जोरदार प्रोडक्शन सुरू आहे.
advertisement
10/10
आता दर महिन्याला इथं  साणंद इथल्या प्लांटमध्ये आता Tata Sierra चं उत्पादन हे दर महिन्याला जवळपास 15 हजार यूनिट इतकं करण्यात येणार आहे.  ICE व्हेरिएंटसह टाटा सियरा EV लवकरच लाँच होणार आहे. जून २०२६ मध्ये Tata Sierra EV लाँच होण्याची शक्यता आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra च्या मायलेजचं सत्य अखेर आलं समोर, RTI मध्ये आश्चर्यकारक आकडेवारी उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल