Mini Fortunerचा मार्केटमध्ये धुमाकूळ! मोठ्या SUV लाही मागे टाकतात फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Toyota ने नवी Land Cruiser FJ ग्लोबली मार्केटमध्ये लॉन्च केली. या मिनी फॉर्च्यूनचरमध्ये दमदार फीचर्स आहे. चला पाहूया ही कार कोणत्या कार्सला देते टक्कर...
advertisement
1/7

मुंबई : टोयेटाने Land Cruiser FJ लॉन्च केलीये. ही सध्या थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आलीये. या कारचा लूक पाहताच क्लासिक FJ40 ची आठवण येते. ही कॉम्पॅक्ट बॉडी-ऑन-फ्रे ऑफ-रोडर कार आहे. जी आता 'फ्रीडम अँड जॉय' च्या नावाने लॉन्च केलीये. ही कार जापानमध्ये 2026 च्या मध्याला लॉन्च केली जाऊ शकते. तर भारतामध्ये ही कार 2028 मध्ये एंट्री मारू शकते. ही कार फर्म्यूनरपेक्षा लहान आणि परवडणारा ऑप्शन ठरेल अशी चर्चा आहे.
advertisement
2/7
थायलंडमध्ये टोयोटा लँड क्रूझर FJ ची स्पेशल इंट्रोडक्टरी प्राइज 1,269,000 थाई बात (36.12 लाख रुपये) आहे. तर फूल प्राइज 1,289,000 थाई बात (36.7 लाख रुपये) राहू शकते. भारतात ही कार 2028 च्या अखेरीस लॉन्च होऊ शकते. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 30 लाख रुपयांहून सुरू होऊ शकते. या कारच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
डिझाइन डिटेल्स : लँड क्रूझर FJचा लूक हा रेट्रो-मॉडर्न आहे. बॉक्सी आणि अपराइड सिल्हूट, स्क्वायर बॉडी पॅनल, फ्लेयर्ड व्हील आर्चेस, ब्लॅक प्लास्टिक क्लँडिंग, चंकी बंपर्स आणि रियरवर माउंटेड स्पेयर व्हील या कारला हार्डकोर ऑफ-रोडर बनवतात. LED हेडलँप्समध्ये U-शेप DRL आणि हेरिटेज टच आहे. कारचे डायमेंशन किती असेल तर या कारची लांबी 4575 mm, रूंदी 1855 mm, उंची 1960 mm आणि व्हीलबेस 2580 mm असेल. ग्राउंड क्लियरेन्स चांगला राहील.
advertisement
4/7
केबिन आणि कंफर्ट : या कारचे केबिनही यूटिलिटेरियन आणि फंक्शनल आहे. सिंपल डॅशबोर्ड, मोठे ग्रॅब हँडल्स, फिजिकल बटण, 12.5 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळतात. रियर सीट्स रिक्लाइनिंग आहे. 5-सीटर लेआउटमध्ये चांगली व्हिजिबिलिटी आणि प्रॅक्टिकलिटी आहे. मटेरियल टफ आणि ड्यूरेबल आहे. ज्यामुळे ही कार ऑफ-रोडिंगसाठी बेस्ट ठरते.
advertisement
5/7
फीचर्स आणि सेफ्टी : कंपनीने ही कार टोयोटा सेफ्टी सेन्स, 360 डिग्री कॅमेरा, मल्टी-टेरेन सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ (टॉप व्हेरिएंटमध्ये), व्हेंटिलेटेड सीट्स आणि अडव्हान्सड कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स दिलेय. फोक ऑफ-रोड कॅपेबिलिटीवर आहे. ही 4WD सह हाय-लो रेंज गियर दिलेय. सेफ्टीसाठी लेव्हल-2 ADAS सूट, 7 एयरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड, हिल डिसेंट आणि मजबूत लँडर फ्रेम चेचिस दिलाय.
advertisement
6/7
इंजिन आणि मायलेज : ही कार 2.7 लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजनसह खरेदी केली जाऊ शकेल. जी 163 PS पावर आणि 246 Nm टॉर्क देते. यामध्ये 6-स्पीड ऑटमॅटिक ट्रान्समिशनसह पार्ट-टाइम 4WD स्टँडर्ड आहे. हायब्रिड आणि PHEV व्हेरिएंटही येणार आहेत.
advertisement
7/7
मायलेज किती देते : शहरामध्ये ही कार 8-10 kmpl आणि हायवेवर 12-14 kmpl च्या आसपास मायलेज देऊ शकते. भारतीय मार्केटमध्ये या कारची एंट्री झाल्यास, ती Mahindra Thar आणि Maruti Jimny सारख्या कारला टक्कर देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mini Fortunerचा मार्केटमध्ये धुमाकूळ! मोठ्या SUV लाही मागे टाकतात फीचर्स