TRENDING:

धावत्या ट्रॅव्हलर बसने घेतला पेट; काचा फोडून प्रवाशांनी वाचवला जीव, अंगावर काटा आणणारे PHOTO

Last Updated:
नगर पुणे महामार्गावर लोणीकंदजवळ ट्रॅव्हलर बसला लागलेल्या भीषण आगीत चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बचावले तरी सामान जळाले.
advertisement
1/6
धावत्या ट्रॅव्हलर बसने घेतला पेट; काचा फोडून प्रवाशांनी वाचवला जीव, अंगावर काटा आणणारे PHOTO
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: एका ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असताना अचानक धूर येऊ लागला आणि ड्रायव्हरला काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण ट्रॅव्हल्समधून धूर येत होता. प्रवासी धुरामुळे गुदमरले. श्वास घेणं कठीण झालं.
advertisement
2/6
नगर-पुणे महामार्गावर लोणीकंदजवळ आज एका ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. गाडीत आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांची मोठी पळापळ झाली, मात्र चालकाने क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोठा अनर्थ टळला.
advertisement
3/6
पुण्याच्या दिशेने जात असताना इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या नजरेस पडले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तात्काळ बस थांबवली आणि आरडाओरडा करून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली.
advertisement
4/6
बसने काही वेळातच रौद्र रूप धारण केले होते. प्रसंगावधान राखत चालकाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडू शकले. काही प्रवाशांना मुख्य दरवाज्यातून बाहेर पडणे कठीण झाल्याने, त्यांनी परिस्थितीची भीषणता पाहून बसच्या काचा फोडल्या आणि बाहेर पडण्याचा मार्ग निवडला.
advertisement
5/6
आगीच्या ज्वाळा बसभर पसरण्याआधीच प्रवाशांनी बाहेर उड्या घेतल्या. या गोंधळात प्रवाशांचे काही सामान जळाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे पाहताच लोणीकंद परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी मोठी धाव घेतली.
advertisement
6/6
मिळेल त्या साधनांनी आणि पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आणि बसचा कोळसा होण्यापासून वाचली. लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
धावत्या ट्रॅव्हलर बसने घेतला पेट; काचा फोडून प्रवाशांनी वाचवला जीव, अंगावर काटा आणणारे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल