Cancer Alert : ऐन तारुण्यात शरीरात दिसत असतील 'हे' बदल, तर सावध व्हा! कॅन्सरची असू शकते सुरुवात..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Colon Cancer Symptoms : कॅन्सरचं प्रमाण हल्ली भारतामध्ये वाढत चाललं असेल. वेगवेगळ्या कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं असतात. तरुण वर्गामध्ये शरीरात काही बदल दिसल्यास त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
1/9

हल्ली एकूणच सर्व वातावरण बदललं आहे. पूर्वीसारखं अन्न, काम हल्ली मिळत नाही. कम्म खूप जास्त आणि खायला प्यायला पुरेसा वेळ नाही, अशी हल्लीची परिस्थिती आहे. त्यामुळे साहजिकच तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तरुण मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. अशातच तरुणांमध्ये हल्ली कोलन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, अशी माहिती एबीपीच्या वृत्तामध्ये दिली आहे.
advertisement
2/9
कोलन कॅन्सरच्या केसेस वाढत चालल्यामुळे डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचा इशारा दिलाय. तज्ञांच्या मते, हा आजार शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला, तर ती व्यक्ती जगण्याचा शक्यता खूप कमी होते. म्हणूनच याची लक्षणं वेळीच ओळखणं आणि त्यावर लवकरात लवकर उपचार करणं खूप गरजेचं आहे.
advertisement
3/9
ब्रिस्टलमधील 'द लागोम क्लिनिक'चे जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) डॉ. जॅक ओग्डेन यांच्या मते, कोलन कॅन्सरची पाच लक्षणं बहुतेकवेळा खूपच साधारण आणि सौम्य. या लक्षणांदरम्यान जास्त वेदनाही होत नाहीत. त्यामुळे सहसा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
advertisement
4/9
लक्षणं लवकर लक्षात न येणे, हाच कोलन कॅन्सरच्या रुग्णाला वाचवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणूनच ती सौम्य लक्षणं कोणती आहेत, ज्याकडे तुम्ही दुरक्ष करू नये याबद्दल इथे माहिती दिली गेली आहे. वेळीच निदान झाल्यास रुग्ण वाचू शकतो.
advertisement
5/9
कोलन कॅन्सरमध्ये सर्वात आधी रुग्णाला लोहाची कमतरता किंवा ॲनिमिया होतो. त्याचसोबत विनाकारण थकवा येणं, त्वचा पिवळी पडणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या जाणवतात. हे ट्यूमरमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे होऊ शकतं. दुसरं लक्षण म्हणजे आतड्यांच्या समस्या. यामध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार असे त्रास होतात. ट्यूमरमुळे आतड्यात अडथळा निर्माण झाल्यास अशी होऊ शकतं.
advertisement
6/9
कोलन कॅन्सरचं तिसरं लक्षण म्हणजे तुम्ही प्रयत्न करत नसताना, डाएट किंवा व्यायामाशिवाय वजन कमी होणं. काहीवेळा ट्यूमरमुळे शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. तेव्हा हा त्रास होऊ शकतो. त्यानंतर चौथे लक्षण म्हणजे पोटात सतत वेदना, पेटके येणे, किंवा थोडंसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं. हे देखील एक लक्षण असू शकतं.
advertisement
7/9
कोलन कँसर ओळखण्यासाठी हे लक्षण सर्वात महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला त्वरित कळेल. शौचात रक्त येणे. हा त्रासदेखील कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतो. ही सर्व लक्षणं तुम्हाला वेगवेगळ्या आजारांध्येही जाणवू शकतात. पण कोणत्याही त्रासाला अजिबात गृहीत धरू नका.
advertisement
8/9
कोणताही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्याचे कारण जाणून घ्या. सावध राहूनच आपण भविष्यातलं मोठं नुकसान वाचवू शकतो आणि आपला जीवही..
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer Alert : ऐन तारुण्यात शरीरात दिसत असतील 'हे' बदल, तर सावध व्हा! कॅन्सरची असू शकते सुरुवात..