TRENDING:

90s चे 2 धुरंधर, ज्यांच्यासमोर फिके पडले तिनही खान्स; त्या सिनेमानं एका रात्रीत हादरवलं बॉक्स ऑफिस

Last Updated:
Dhurandhar in 90s : धुरंधर 2 सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 2025-26 धुरंधरने गाजवला. पण तुम्हाला माहिती आहे का 90च्या दशकात देखील धुरंधर होते. जे सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानला पुरून उरले. 
advertisement
1/7
90s चे 2 धुरंधर, ज्यांच्यासमोर फिके पडले तिनही खान्स; त्या सिनेमानं एका रात्रीत हादरवलं बॉक्स ऑफिस
90च्या काळात शाहरुख, सलमान आणि आमिर या तिन्ही खानने बॉलिवूडमध्ये जबरदस्त कामगिरी केली. यात काळात अशा दोन कलाकार पुढे आले ज्यांनी त्यांच्या मजबून शरीरयष्टी आणि प्रभावी स्टंट्सच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवले.
advertisement
2/7
आपण बोलत आहोत अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्याबद्दल.  90च्या दशकात एक काळ असा होता की वितरक आणि सिंगल-स्क्रीन थिएटर मालक अक्षय आणि अजयच्या चित्रपटांसाठी वेडे होते. या दोघांनी मिळून तिन्ही खान्सची एका रात्रीत झोप उडवली होती असं म्हणतात.
advertisement
3/7
जेव्हा शाहरुख खान 'दिवाना' आणि 'बाजीगर'मधून आपली रोमँटिक अँटी-हिरोची इमेज बनवत होता. सलमान खान 'मैने प्यार किया'मुळे चॉकलेट बॉय बनला होता.  तेव्हा अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी अॅक्शनला आपली ओळख बनवलं. 1991 मध्ये 'फूल और कांटे'मधील अजय देवगणच्या एन्ट्रीने तरुणांना प्रेमात पाडलं. 1992 मध्ये अक्षय कुमारने 'खिलाडी'मधील आपल्या मार्शल आर्ट्स कौशल्याने सर्वांना चकित केले.
advertisement
4/7
ज्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये थरारक ॲक्शन आणि अंगावर शहारे आणणारे स्टंट पाहायचे होते, त्यांची पहिली पसंती हे दोन स्टार्स बनले. 1994 हे वर्ष एक ऐतिहासिक वर्ष ठरलं. जेव्हा हे दोन दिग्गज पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले तो चित्रपट होता 'सुहाग'. जेव्हा दिग्दर्शक कुकू कोहलीने अक्षय आणि अजयला एकत्र घेतले तेव्हा चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली. चित्रपटातील 'गोरे गोरे मुखडे पे' सारखी गाणी प्रचंड गाजली पण या दोन स्टार्समधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हेच खरे आकर्षण होते.
advertisement
5/7
अनेक वर्षांनंतर जेव्हा रोहित शेट्टीने त्याच्या 'कॉप युनिव्हर्स'मधील 'सूर्यवंशी' या चित्रपटाद्वारे या दोन कलाकारांना पुन्हा एकत्र आणले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अजय देवगणची 'सिंघम'मधील एन्ट्री आणि अक्षय कुमारची 'सूर्यवंशी'मधील चपळाईने हे सिद्ध केले की काळ बदलला असला तरी या दिग्गजांची जादू आजही कायम आहे.
advertisement
6/7
असे म्हटले जाते की 90 च्या दशकात अक्षय आणि अजयच्या यशामागे त्यांचे 'कनेक्टिव्हिटी' हे सर्वात मोठे कारण होतं. ते सर्वसामान्य माणसाचे हिरो होते. अक्षयच्या 'खिलाडी' मालिकेने त्याला प्रत्येक तरुणासाठी एक आदर्श बनवलं, तर अजयच्या 'विजयपथ' आणि 'दिलवाले'सारख्या चित्रपटांनी त्याला एक गंभीर प्रियकर आणि बंडखोर नायक म्हणून स्थापित केला.
advertisement
7/7
खान बंधूंच्या चित्रपटांमध्ये अनेकदा भव्य सेट आणि आकर्षक ठिकाणे दाखवली जात असताना अक्षय आणि अजयचे चित्रपट वास्तववादी होते. ज्यात धूळ, घाम आणि खरे स्टंट असायचे. यामुळेच त्यांनी सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांवर वर्चस्व गाजवले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
90s चे 2 धुरंधर, ज्यांच्यासमोर फिके पडले तिनही खान्स; त्या सिनेमानं एका रात्रीत हादरवलं बॉक्स ऑफिस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल