TRENDING:

SUV, MUV, XUV आणि TUV मध्ये नेमका फरक काय, 99 टक्के लोक होतील उत्तर देण्यात फेल

Last Updated:
बाजारात अनेक प्रकारच्या कार येतात. तुम्ही SUV, MUV, XUV आणि TUV विषयी ऐकलं असेल. मात्र यामध्ये काय फरक आहे माहितीये का? 99% टक्के लोकांना हा प्रश्न विचारल्यास ते हमखास चुकतील. मग वाचा
advertisement
1/5
SUV, MUV, XUV आणि TUV मध्ये नेमका फरक काय, 99 टक्के लोक होतील उत्तर देण्यात फेल
नवी दिल्ली : तुम्हाला गाड्यांची आवड आहे तर तुम्ही SUV, MUV, XUV आणि TUV फोर व्हीलर्स सेगमेंटविषयी अवश्य ऐकलं असेल. मात्र तुम्हाला याचा फूल फॉर्म माहिती आहे का? तसंच यांच्यातील अंतर तुम्हाला ठाऊक आहे का? खूप लोकांनी याविषयी ऐकलेलं असतं, पण यातील फरकाविषयी ते कंफ्यूज असतात. आज आपण हेच कंफ्यूजन दूर करतोय. चला जाणून घेऊया सोप्या भाषेत.
advertisement
2/5
SUV चा फूल फॉर्म Sport Utility Vehicles (स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल्स) असतो. या पॉवरफूल इंजिनच्या कार असतात. ज्या पॉवरफूल परफॉर्मेंस डिलिव्हरी करतात. यांमध्ये आतल्या बाजूला स्पेसही असतो. यांना ऑफर-रोड ड्रायव्हिंगसाठी ओळखलं जातं. SUV वेगवेगळ्या साइजमध्येही येते. जसं की, Fortuner सारख्या कार फूल साइज SUV म्हटल्या जातात. तर Brezza एक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे आणि Creta मिड-साइज एसयूव्ही आहे.
advertisement
3/5
MUVचा फूल फॉर्म Multi Utility Vehicles (मल्टी यूटिलिटी व्हीकल्स) असतो. नावावरुन समजू शकता. ही कार अनेक प्रकारच्या कामांसाठी तयार केली असते. यात अनेक लोक येऊ शकतात. तसंच यात बरंच साहित्य आणि वजनही ठेवलं जाऊ शकतं. याची ऑन-रोड परफॉर्मेंस खूप चांगली असते. मात्र, ऑफ-रोड परफॉर्मेंस SUV सारखी चांगली नसते.
advertisement
4/5
XUV चा फूल फॉर्म Crossover Utility Vehicles (क्रॉसओवर यूटिलिटी व्हीकल्स) असतो. ही एक प्रकारची व्हीकल असते. जी दोन्हीही जागांवर चांगल्या परफॉर्मेंससाठी तयार केली जाते. म्हणजेच ती MUV प्रमाणे भरपूर स्पेससह येते. यामधून अनेक काम केली जाऊ शकतात. यासोबतच ही SUV प्रमाणे रफही असते. याला ऑफ-रोड्सही सहज चालवलं जाऊ शकतं. भारतीय बाजारात महिंद्राची XUV सीरीज खूप प्रसिद्ध आहे. यात Mahindra XUV300, Mahindra XUV500 आणि Mahindra XUV700ची नावं सामिल आहेत.
advertisement
5/5
TUVचा फूल फॉर्म Tough Utility Vehicles (टफ यूटिलिटी व्हीकल्स) ही कार फीचर्समध्ये SUV कारप्रमाणे असते. मात्र ही साइजमध्ये SUV पेक्षा थोडी लहान असते. यांना mini sport utility vehicles (मिनी स्पोर्ट यूटिलिटी व्हीकल्स) म्हणजे Mini SUV ही म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
SUV, MUV, XUV आणि TUV मध्ये नेमका फरक काय, 99 टक्के लोक होतील उत्तर देण्यात फेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल