या शाळेची फी खिशाला परवड्यासारखी नाहीच, Admission करण्याआधी वाचा ही माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रत्येकाला वाटते आपल्या मुलांचे शिक्षण चांगल्या शाळांमध्ये व्हावे. त्यामुळे आज आपण दिल्लीतील काही बेस्ट आणि महागड्या शाळांबाबत जाणून घेऊयात. (गौहर, प्रतिनिधी, दिल्ली)
advertisement
1/7

पाथवे स्कूल ही केवळ दिल्लीतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय शाळांपैकी एक आहे. प्रत्येकाला आपल्या मुलांना या शाळेत पाठवायचे असते. ही शाळा ग्रेटर कैलास, दिल्ली येथे आहे. या शाळेची त्रैमासिक फी 1 लाख 47 हजार रुपये आहे.
advertisement
2/7
अमेरिकन एम्बेसी स्कूल दिल्लीतील सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. अनेक जण आपल्या मुलांना या शाळेत शिकवण्यासाठी उत्सुक असतात. ही शाळा दिल्लीतील चाणक्यपुरी येथे आहे. या शाळेची वार्षिक फी 20 लाखांहून अधिक आहे.
advertisement
3/7
ब्रिटिश स्कूल ही दिल्लीतील सर्वोत्तम शाळांपैकी एक मानली जाते. मुलांना विविध प्रकारचे ज्ञान दिले जात असल्याने, तसेच याच्या अभ्यासक्रमाबद्दल या शाळेचे खूप कौतुक होते. ही शाळा दिल्लीतील चाणक्यपुरी येथे आहे. या शाळेची त्रैमासिक फी 1 लाख 76 हजार 500 रुपये आहे.
advertisement
4/7
जीडी गोएंका वर्ल्ड स्कूल ही केवळ दिल्लीतीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम शाळांपैकी एक मानली जाते. या शाळेची वार्षिक फी आठ लाख रुपये आहे. ही शाळा दिल्लीत अनेक ठिकाणी आहे.
advertisement
5/7
मॉडर्न स्कूलसुद्धा शिक्षणाच्या दृष्टीने दिल्लीतील सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट शाळा आहे. त्यामुळे सर्व पालकांना आपल्या मुलांना या शाळेत पाठवायचे असते. या शाळेची मासिक फी 15 हजार रुपये असून प्रवेश फी 50 हजार रुपये आहे.
advertisement
6/7
डीपीएस इंटरनॅशनल स्कूल ही आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध शाळांपैकी एक आहे. ही शाळा दिल्लीच्या साकेत भागात आहे. या शाळेची नर्सरी फी 22 हजार रुपये आहे. अनेक पालकांना वाटते की आपली मुले याठिकाणी शिकावीत.
advertisement
7/7
श्रीराम शाळा ही दिल्लीतील सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. ही शाळा दिल्लीतील वसंत विहार येथे आहे. या शाळेची मासिक फी 15 हजार रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
या शाळेची फी खिशाला परवड्यासारखी नाहीच, Admission करण्याआधी वाचा ही माहिती