photos : आई सुरक्षारक्षक, तरुणानं youtube वरुन केला अभ्यास, आता सैन्यदलात झाला मोठा अधिकारी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक ठिकाणी सोयीसुविधा नसतानाही तरुण-तरुणी कठोर परिश्रम करुन यश मिळवताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची कहाणी जाणून घेणाार आहोत, ज्याने अत्यंत कठीण परिस्थितीत मोठं यश मिळवले आहे. हा तरुण आज सैन्यदलात अधिकारी झाला आहे. (सोनिया मिश्रा, प्रतिनिधी, चमोली)
advertisement
1/5

प्रशांत असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय फक्त 19 वर्षे आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्याने सेल्फ स्टडी केला आणि आज प्रशांत सैन्यदलात अधिकारी झाला आहे. त्याची आई शकुंतला देवी ऋषिकेश एम्स याठिकाणी गार्डची नोकरी करतात. तर त्याचे वडील जेपी भट्ट हे याच ठिकाणी पीआरओ विभागात कार्यरत आहेत.
advertisement
2/5
प्रशांत हा उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कुंड डुंगरा, स्वर्का पट्टी कपीरी, पोस्ट ऑफिस नौली, तालुका कर्णप्रयाग येथील रहिवासी आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी त्याचे वडील नोकरीच्या शोधात कुटुंबासह ऋषिकेशला आहे.
advertisement
3/5
प्रशांतने एनडीएमध्ये 303 वी रँक मिळवली आहे. लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, हा त्याचा चौथा अटेम्प्ट होता. यामध्ये त्याला यश मिळाले. त्याने एनडीएसाठी 12 वी पासूनच तयारी सुरू केली होती. तसेच मागील 3 प्रयत्नात त्याला अपयश मिळाले. मात्र, मागच्या वेळी झालेल्या चुकांमधून शिकत त्याने आज हे यश मिळवले.
advertisement
4/5
प्रशांतने सांगितले की, त्याने आपल्यातील कमतरता लक्षात घेता त्याच्यावर काम केले. तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि सामाजिक कौशल्य विषय मजबूत करण्यावर काम केले. सुरुवातीला काही महिने त्याने कोचिंगही केली.
advertisement
5/5
मात्र, नंतर त्याने सेल्फ स्टडीवर भर दिला आणि घरी राहूनच यूट्यूबचा अभ्यास केला. लवकरच तो पुणे येथील खडकवासला याठिकाणी ट्रेनिंगसाठी येणार आहे. यानंतर एक वर्षांची ट्रेनिंग आयएमए डेहराडून याठिकाणी करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
photos : आई सुरक्षारक्षक, तरुणानं youtube वरुन केला अभ्यास, आता सैन्यदलात झाला मोठा अधिकारी