TRENDING:

Women's Day 2024: तू गं दुर्गा! या महिला बनवतात देशातलं सर्वात Powerful इंजिन

Last Updated:
आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. एकेकाळी कमकुवत समजल्या जाणाऱ्या महिला आपला नाजूकपणा टिकवून आज ट्रेनपासून मोठमोठी लढाऊ विमानं उडवतात. आज आपण त्या आदर्श महिलांबाबत जाणून घेऊया ज्या रेल्वेचं सर्वात शक्तिशाली इंजिन बनवतात. त्यांनी बनवलेले इंजिन आज रुळांवरही धावतात. (उद्धव कृष्ण, प्रतिनिधी / पाटणा)
advertisement
1/8
Women's Day : तू गं दुर्गा! या महिला बनवतात देशातलं सर्वात Powerful इंजिन
तृष्णा सिंग, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी, मधेपुरा येथे WH असोसिएट म्हणून काम करतात, गोदामापासून फिटिंग लाइनपर्यंत साहित्यांची तपासणी आणि देखरेख त्या करतात.
advertisement
2/8
शांगवी गुप्ता, मधेपुराच्या रेल्वे इंजिन कारखान्यात यांत्रिक सहयोगी म्हणून काम करतात. बोगी असेंब्ली लाईनमधील फिटर आणि बोगी, शॉप फ्लोअरची कामं त्या पाहतात.
advertisement
3/8
हा रेल्वे इंजिन कारखाना भारतीय रेल्वे आणि फ्रेंच कंपनी अल्स्टॉम यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत मधेपुरा जिल्ह्यातील चकला गावात सुरू करण्यात आला होता. रेल्वे इंजिन कारखान्यात काम करणाऱ्या या महिला स्वावलंबी तर आहेतच, परंतु आधुनिक भारताचं त्या भविष्य आहेत.
advertisement
4/8
ऑफलाइन सब असेंब्ली स्टेशनमध्ये इलेक्ट्रिकल असोसिएट म्हणून कार्यरत असलेल्या यशी कुमारी यांना कारखान्यात इलेक्ट्रिकल लूमिंगची जबाबदारी देण्यात आली आहे, जी त्या अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहेत.
advertisement
5/8
प्रीती कुमारी, कारखान्यात लाइन फीडर आणि लॉजिस्टिक प्रक्रिया तज्ज्ञासह टो ट्रक ड्रायव्हिंग तज्ज्ञ म्हणून काम करतात, त्या टो ट्रक चालवतात. ज्याद्वारे महत्त्वाचे साहित्य गोदामातून कारखान्यात नेले जातात.
advertisement
6/8
विदिशा सिंह, मेकॅनिकल असोसिएटच्या पदावर कार्यरत आहेत. ऑफलाइन स्टेशनमध्ये फिटरचं काम, तसंच ऑफलाइन सब असेंब्ली स्टेशनमधील सर्व मेकॅनिकल इन्स्टॉलेशनची कामं त्या पाहतात.
advertisement
7/8
सुप्रिया सिंग या EPU व्यवस्थापक म्हणून ऑफलाइन स्टेशनचं नेतृत्त्व करतात. सुप्रिया यांच्यावर ऑफलाइन स्टेशनच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
advertisement
8/8
10 एप्रिल 2018 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधेपुरा इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन फॅक्टरीमध्ये बनवलेल्या देशातील पहिल्या 12,000 हॉर्स पॉवर (HP) इलेक्ट्रिक पॉवरच्या रेल्वे इंजिनचं उद्घाटन केलं होतं. हे रेल्वे इंजिन वापरणारा भारत हा जगातला सहावा देश ठरला आहे. याआधी रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडन या पाच देशांमध्ये 12,000 एचपी इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन वापरले जात होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Women's Day 2024: तू गं दुर्गा! या महिला बनवतात देशातलं सर्वात Powerful इंजिन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल