Career After 12th: बारावीनंतर काय करावं? 'हे' शॉर्ट टर्म कोर्स बदलतील आयुष्य!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
राज्यात सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. बारावीनंतर आता पुढे काय, हा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर असेलच. असं म्हणतात की, बारावी ही आयुष्यातली सर्वात मोठी पायरी असते, त्यावरच आपलं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे पुढे काय करायचं, याबाबत व्यवस्थित विचार करूनच निर्णय घ्यावा. परंतु बारावीनंतरच्या सुट्टीत वेळ वाया न घालवता कोणते कोर्स करून ठेवणं आपल्या फायद्याचं ठरेल, पाहूया. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/5

डिप्लोमा इन कॉम्पुटर अॅप्लिकेशन : इयत्ता बारावीनंतर नोकरी मिळवण्यासाठी अगदी एका महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंत कालावधीचे अनेक कोर्स उपलब्ध आहेत. कॉम्पुटर अॅप्लिकेशन डिप्लोमा केल्यास मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी मिळू शकते. या कोर्सनंतर सॉफ्टवेयर डेव्हलपर, सॉफ्टवेयर मॅनेजर आणि ग्राफिक डिझायनर होण्याची संधी मिळते.
advertisement
2/5
इव्हेंट मॅनेजमेंट : आपल्याला मॅनेजमेंट विभागाची आवड असेल, तर आपण बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा करू शकता. त्यासाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. या कोर्सनंतर ब्रँड मॅनेजिंग, नेटवर्किंग, होस्टिंग, बजेट मॅनेजिंग, मीडिया मॅनेजमेंट, इत्यादी क्षेत्रात आपण करियर करू शकता.
advertisement
3/5
डिजिटल मार्केटिंग कोर्स : सध्या या कोर्सचा प्रचंड बोलबाला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांमुळे डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची गरज निर्माण होते. हा शॉर्ट टर्म कोर्स केल्यानंतर तुम्हाला एसईओपासून वेब अॅनालिटिक्स आणि अॅफिलिएट मार्केटिंगबाबत विस्तृत माहिती मिळेल.
advertisement
4/5
फोटोग्राफी कोर्स : आपल्याला फोटोग्राफीची विशेष आवड असेल, त्यातच करियर करायचं असेल तर आपण फोटोग्राफीचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. या शॉर्ट टर्म कोर्समध्ये आपल्याला कॅमेरा टेक्निक, लायटिंग आणि पोस्ट-प्रोसेसिंगबाबत विस्तृत माहिती मिळेल.
advertisement
5/5
डिप्लोमा इन फॉरेन लँग्वेज : हा कोर्स केल्यानंतर आपल्याला एक उत्तम पगाराची नोकरी मिळू शकते. भाषा हा संवादातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो. म्हणूनच एखादी फॉरेन लँग्वेज शिकल्यास पुढे आपण इतरांना तिचंं प्रशिक्षण देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Career After 12th: बारावीनंतर काय करावं? 'हे' शॉर्ट टर्म कोर्स बदलतील आयुष्य!