7 वेळा अपयश, पण आठव्यांदा बाजी मारलीच!, गावातल्या तरुणानं मिळवलं मोठं यश, तुम्हालाही वाटेल अभिमान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये खूप कमी असतात, ज्यांना या परीक्षेत यश मिळते. नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये अत्यंत ग्रामीण भागातील एका तरुणाने प्रचंड मेहनत करुन यश मिळवले आहे. रवि मीना असे या तरुणाचे नाव आहे. नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर तो आपल्या गावी आला. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. (मनीष पुरी/भरतपुर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

रवि मीना या तरुणाने संपूर्ण भारतात ऑल इंडिया रँक 625 मिळवली. यानंतर ते आपल्या वडिलोपार्जित गावी पीरीकिरार येथे आला. याठिकाणी गावकऱ्यांनी त्यांच्या आई वडिलांचे तसेच त्यांचे स्वागत केले. ही परीक्षा पास होणारा रवी मीना हे गावातील एकमेव तरुण आहेत. त्यामुळे गावात त्यांची विजयी मिरवणूकही काढण्यात आली.
advertisement
2/5
रवि मीना यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, हा त्यांचा आठवा प्रयत्न होता. सध्या ते दिल्लीत आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. आता रँकच्या आधारावर त्यांना आयपीएस ही सेवा मिळणार आहे.
advertisement
3/5
नागरी सेवा परीक्षेत त्यांचा विषय हा लोकप्रशासन राहिला आणि पदवीचे शिक्षण घेतल्यावर SSC च्या माध्य्मातून 7 वर्षांपूर्वी त्यांनी आयकर विभागात निरीक्षक पदावर नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांनी नागरी सेवा परिक्षेची तयारी सुरू केली होती.
advertisement
4/5
रवि यांनी सांगितले की, नोकरीमध्ये राहून या परिक्षेची तयारी करणे कठीण होते. मात्र, वेळेचे व्यवस्थापन करुन मी आठव्या प्रयत्नात यशस्वी झालो. तरुणांनी नेहमी मोठी स्वप्न पाहायला हवीत आणि संपूर्ण निष्ठेने तसेच समर्पण भावाने आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
5/5
रवि यांनी सांगितले की, नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी रेगुलर स्टडीवर जोर द्यायला हवा. जर तुम्ही अत्यंत जिद्दीने, कष्टाने झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
7 वेळा अपयश, पण आठव्यांदा बाजी मारलीच!, गावातल्या तरुणानं मिळवलं मोठं यश, तुम्हालाही वाटेल अभिमान