प्लॅन परफेक्ट होता पण थोडक्यात फुटलं बिंग, क्रिम बिस्किटातून 62 कोटींच्या ड्रग्सची तस्करी, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई विमानतळावर DRI ने ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह भारतीय महिलेला अटक केली. बिस्किटे आणि चॉकलेट बॉक्समध्ये ३०० कॅप्सूलमध्ये ड्रग्ज लपवले होते. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. दोहा (कतार) येथून भारतात परतलेल्या एका भारतीय महिलेकडून तब्बल ६२ कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी उघडकीस आली आहे.
advertisement
2/7
या घटनेने अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा एक मोठा जाळं पुन्हा एकदा समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडे कोकेन कोणत्याही पारंपरिक पद्धतीने सापडलं नाही. बिस्किटे आणि चॉकलेटच्या बॉक्समध्ये अत्यंत कुशलतेने पॅक केलेल्या तब्बल ३०० कॅप्सूलमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.
advertisement
3/7
संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून, DRI अधिकाऱ्यांनी महिलेला थांबवले आणि तिच्या सामानाची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये या कॅप्सूल सापडल्या आणि त्यामधून सुमारे ६२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले.
advertisement
4/7
महिलेला लगेचच अटक करण्यात आली असून तिच्यावर NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीच्या चौकशीत तिने या ड्रग्ज कुठून आणि कशासाठी आणली, याबाबत काही माहिती दिली असली, तरी संपूर्ण तस्करी नेटवर्कचा शोध घेण्यासाठी DRI चा तपास सुरू आहे.
advertisement
5/7
या प्रकारामुळे कोकेनसारख्या महागड्या आणि अत्यंत घातक अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कचा एक दुवा भारतात उघडकीस आला आहे, असा DRI चा प्राथमिक अंदाज आहे. दोहतून मुंबईपर्यंत हे कोकेन कुणाच्या सांगण्यावरून आणलं गेलं? त्यामागे कोणती टोळी आहे? भारतात त्याचे कोणते संपर्क आहेत? या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
advertisement
6/7
[caption id="attachment_1435813" align="alignnone" width="750"] तपास यंत्रणांना असा संशय आहे की, ही महिला केवळ 'ड्रग म्युल' म्हणून वापरली गेली असावी. अशा महिला कुरियरना पैशांच्या मोबदल्यात परदेशातून भारतात ड्रग्ज घेऊन यायला प्रवृत्त केलं जातं. त्यासाठी खास ट्रेनिंग, फसव्या गोष्टी आणि भ्रामक माहिती दिली जाते.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
DRI कडून याप्रकरणी अजून काही अटका होण्याची शक्यता असून, या कारवाईने मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
प्लॅन परफेक्ट होता पण थोडक्यात फुटलं बिंग, क्रिम बिस्किटातून 62 कोटींच्या ड्रग्सची तस्करी, PHOTO