25 वर्षांचा संसार, 3 मुलं अन्... लोकप्रिय टीव्ही जोडप्याचा घटस्फोटाचा निर्णय; अभिनेत्याने सांगितलं काळजाला भिडणारं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
TV Celebrity Couple Divorce: ज्यांनी चक्क २५ वर्षं सुखाचा संसार केला, ज्यांना तीन मुलं आहेत, असं इंडस्ट्रीतील एक आदर्श मानलं जाणारं जोडपं आता विभक्त होत आहे.
advertisement
1/8

रूपेरी पडद्यावरची नाती जितकी सुंदर दिसतात, तितकीच ती आतून नाजूक असतात. ज्यांनी चक्क २५ वर्षं सुखाचा संसार केला, ज्यांना तीन मुलं आहेत, असं इंडस्ट्रीतील एक आदर्श मानलं जाणारं जोडपं आता विभक्त होत आहे.
advertisement
2/8
मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील दिग्गज अभिनेता मनु वर्मा आणि त्यांची पत्नी सिंधु वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सध्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका मुलाखतीत मनु वर्मा यांनी आपल्या तुटलेल्या नात्यावर मौन सोडलं.
advertisement
3/8
ते म्हणाले, "आम्ही सध्या कायदेशीररित्या घटस्फोटित नाही, पण आम्ही वेगळे राहत आहोत. आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता खूपच कमी आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत आमच्यात सगळं आलबेल होतं, प्रचंड प्रेम होतं. पण नाती बदलायला वेळ लागत नाही. परिस्थिती विरोधात गेली की, २५ वर्षांचा घट्ट पाया असलेला संसारही कोसळू शकतो."
advertisement
4/8
मनु यांनी फॅमिली कोर्टातील कटू अनुभवांवरही भाष्य केलं. "कोर्टात गेल्यावर लोक एकमेकांवर फक्त आरोप करतात. जो जोडीदार एकेकाळी जीवापाड प्रिय होता, त्याच्यावरच तिथे चिखल फेकला जातो. हे सगळं खूप क्लेशदायक असतं. भांडत एकत्र राहण्यापेक्षा सन्मानाने वेगळं झालेलं कधीही चांगलं," असं मत त्यांनी मांडलं.
advertisement
5/8
परदेशात लोक घटस्फोटानंतरही मित्र म्हणून राहतात, तशी संस्कृती आपल्याकडे का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
6/8
या जोडप्याला तीन मुलं आहेत. मोठा मुलगा अमेरिकेत आयटी इंजिनीअर आहे, दुसरा बंगळुरूमध्ये स्थायिक आहे, तर धाकट्या मुलीला आरोग्याच्या काही समस्या आहेत.
advertisement
7/8
विशेष म्हणजे, मनु वर्मा हे दिग्गज अभिनेते जगन्नाथ वर्मा यांचे सुपुत्र आहेत. मात्र, त्यांनी कधीही वडिलांच्या नावाचा वापर कामासाठी केला नाही. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी १९९४ मध्ये पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती, कारण अभिनयातील अनिश्चितता वडिलांना ठाऊक होती.
advertisement
8/8
मनु आणि सिंधु या जोडीने 'कदमत्ताथु कथनार' आणि 'कुमकुमचेप्पु' सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की खऱ्या आयुष्यात हे दोघं कधी एकमेकांपासून दुरावतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
25 वर्षांचा संसार, 3 मुलं अन्... लोकप्रिय टीव्ही जोडप्याचा घटस्फोटाचा निर्णय; अभिनेत्याने सांगितलं काळजाला भिडणारं कारण