TRENDING:

OMG! तब्बल 72 गाणी, तुम्ही पाहिली की नाही ही हिंदी फिल्म; गिनीज बुकमध्येही नोंद, कुणीच मोडू शकला नाही रेकॉर्ड

Last Updated:
72 Songs Film : ही फिल्म म्हणजे फक्त एक चित्रपट नाही, तर तो गाण्यांचा महोत्सव. 72 गाणी असलेली ही फिल्म भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अद्भुत, अजब आणि अभिमानास्पद विक्रम म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने आजही जगातील सर्वाधिक गाणी असलेला चित्रपट म्हणून आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे.
advertisement
1/7
72 गाणी असलेली हिंदी फिल्म? गिनीज बुकमध्येही नोंद, आजवर कुणीच मोडू शकला नाही
फिल्म म्हणजे त्यात गाणी आलीच. फिल्मआधी त्या फिल्मची गाणीच हिट होत असतात. आता सगळ्यात जास्त गाणी कोणत्या फिल्ममध्ये आहे असं विचारलं तर साहजिकत बहुतेकांच्या तोंडात हम आपके है कौन, हम साथ साथ है या फिल्म्सची नावं येतील. हम साथ साथ है फिल्ममध्ये 7 तर हम आपके है कौनमध्ये 14 गाणी आहेत. आता फिल्ममध्ये 5-7 गाणी असली तरी ती प्रेक्षकांना जास्त वाटतात. पण तुम्हाला माहिती आहे का एक अशी हिंदी फिल्म ज्यात तब्बल 72 गाणी होती. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/7
या फिल्ममध्ये  प्रत्येक प्रमुख पात्रासाठी स्वतंत्र गाणी होती. प्रेम, विरह, सौंदर्यवर्णन, देवसभा, नृत्य, ऋतू वर्णन यासाठी वेगळी गाणी होती. यात 9 ठुमऱ्या, 4 होळी गीतं, 15 सामान्य गाणी, 31 गझल, 2 चौबोला, 2 छंद आणि 2 इतर गाण्यांचा समावेश होता. इतकी गाणी असल्यामुळे चित्रपटाची लांबीही प्रचंड होती. काही अंदाजानुसार ही फिल्म साडेतीन तासांपेक्षा जास्त होती. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/7
72 गाणी असलेल्या या फिल्मची गिनीज बुकमध्येही नोंद आहे. गाण्याच्या बाबतीत या फिल्मचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही. आजपर्यंत कोणताही भारतीय किंवा विदेशी चित्रपट हा विक्रम मोडू शकलेला नाही. चित्रपट अभ्यासक आणि सिनेप्रेमी याचा उल्लेख रेकॉर्ड होल्डर म्हणून करतात. काही जण या फिल्ममध्ये 71 तर काही 69 गाणी असल्याची दावा करतात.
advertisement
4/7
या फिल्मची स्टोरी होती एका न्यायप्रिय राजाची. देवांच्या परीक्षेत त्याला एक परी एका गरीब महिलेच्या रूपात भेटते आणि राजा तिच्या प्रेमात पडतो. आता ही फिल्म कोणती? त्याचं नाव ऐकण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
5/7
तर या फिल्मचं नाव आहे इंद्रसभा. 1932 साली प्रदर्शित झालेली ही फिल्म उर्दू नाटककार आगा हसन अमानत यांच्या प्रसिद्ध उर्दू नाटकावर आधारित. मूळ नाटकच संगीतप्रधान असल्यामुळे त्याच धर्तीवर चित्रपटही बनवण्यात आला. फिल्मचं दिग्दर्शन जे.जे. मदन यांनी केलं होतं.
advertisement
6/7
त्या काळात चित्रपट हा केवळ मनोरंजन नव्हे तर रंगभूमीचा विस्तार मानला जात असे. त्यामुळे संवादांपेक्षा गाण्यांना अधिक महत्त्व दिलं जात होतं. आज जिथे गाणी ही कथेची पूरक असतात, तिथे त्या काळात कथा ही गाण्यांना पूरक होती
advertisement
7/7
1930 च्या दशकात टॉकीज नवीन होते. लोकांना पडद्यावरून थेट आवाज, संगीत आणि गाणी ऐकण्याचं आकर्षण होतं. त्या काळात प्रेक्षक थिएटरमध्ये जास्त वेळ बसायला तयार असायचे, कारण चित्रपट पाहणं ही एक उत्सवसदृश घटना मानली जायची. रेडिओ फारसा सर्वसामान्य नव्हता, त्यामुळे चित्रपट हेच संगीताचं प्रमुख माध्यम होतं गाणी लक्षात राहावीत, तोंडपाठ व्हावीत यासाठी त्यांची संख्या जास्त ठेवली जायची. (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OMG! तब्बल 72 गाणी, तुम्ही पाहिली की नाही ही हिंदी फिल्म; गिनीज बुकमध्येही नोंद, कुणीच मोडू शकला नाही रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल