89 वर्षीय हा अभिनेता, स्वत: दत्तक घेतलेल्या मुलीसोबतच थाटला संसार; लैंगिक शोषणाचाही लागलेला आरोप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Actor Married His Step-Daughter : प्रसिद्ध अभिनेता स्वत: दत्तक घेतलेल्या एका मुलीसोबततच लग्नबंधनात अडकला होता. 89 वर्षीय या अभिनेत्याची संपूर्ण जगभर चर्चा झाली होती.
advertisement
1/7

एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:चं दत्तक घेतलेल्या एका मुलीसोबत संसार थाटला होता. हा अभिनेता लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य मात्र खूप गुंतागुंतीचं होतं.
advertisement
2/7
वुडी एलन असं या अभिनेत्याचं नाव आहे. एनी हॉल, मिडनाइट इन पेरिस आणि मैनहट्टन हे त्याचे चित्रपट सुपरहिट ठरले. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
advertisement
3/7
सून-यी प्रेविनसोबत वुडी अॅलन 1997 मध्ये लग्नबंधनात अडकला. सून-यीचा जन्म 1970 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाला. सून-यी अनाथ होती आणि 1978 मध्ये मिया फॅरो यांनी त्यांना दत्तक घेतले.
advertisement
4/7
मिया वुडीच्या जोडीदार होत्या. त्यामुळे सून-यी ही वुडी यांची दत्तक मुलगी होती. सून-यीने शिक्षण पूर्ण केले आणि न्यूयॉर्कमध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केले. सध्या ती एक गृहिणी असून दोन मुलींची आई आहे.
advertisement
5/7
वुडी अ‍ॅलन आणि सून-यी यांच्या नात्याची सुरुवात 1992 मध्ये झाली. त्यावेळी सून-यी 21 वर्षांची होती. वुडी आणि सून-यी यांच्या लग्नाची बातमी ऐकताच मियाला मोठा धक्का बसला होता. 1992 मध्ये मियाची दत्तक मुलगी डिलन ने वुडीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर वुडीची प्रतिमा खराब झाली. त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं.
advertisement
6/7
वुडी अ‍ॅलनचे काही हिट चित्रपटांमध्ये एनी हॉल (१९७७) चा समावेश आहे. या चित्रपटाने ऑस्कर जिंकला आणि हाच वुडीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर अनेक दर्जेदार चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून वुडी अॅलन प्रेक्षकांच्या भेटीला आले.
advertisement
7/7
वुडी अॅलनची एकूण संपत्ती 140 मिलियन डॉलरच्या आसपास आहे. आज वयाच्या 89 वर्षातही ते वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
89 वर्षीय हा अभिनेता, स्वत: दत्तक घेतलेल्या मुलीसोबतच थाटला संसार; लैंगिक शोषणाचाही लागलेला आरोप