TRENDING:

Vicky - Katrina : ओय होय! इतका आनंद की, विक्की कतरिनाआधी संतोष जुवेकरने केलं त्यांच्या बाळाचं नामकरण; दिलं खास नाव

Last Updated:
अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ आई - बाबा झाल्यानंतर संतोष जुवेकरने त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. त्याने त्यांच्या बाळाला खास नावही दिलं.
advertisement
1/8
विक्की कतरिनाआधी संतोष जुवेकरने केलं त्यांच्या बाळाचं नामकरण; दिलं खास नाव
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विक्की आणि कतरिना आई बाबा झालेत.
advertisement
2/8
कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला. विक्की कतरिना पहिल्यांदा आई बाबा झालेत, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
advertisement
3/8
"आमच्या आनंदाचं आगमन झालं आहे. प्रेम आणि कृतज्ञनेचे आम्ही आमच्या गोंडस मुलाचं स्वागत करत आहोत", असं म्हणत विक्की कौशल आणि कतरिनाने आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
4/8
दोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आणि विक्की-कतरिनाच्या तमाम चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
5/8
त्यात एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने विक्की कौशलला तो बाबा झाल्याच्या शुभेच्छा दिल्यात. संतोषनं केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
advertisement
6/8
विक्की कौशल आणि संतोष जुवेकर यांनी छावा या सिनेमात एकत्र काम केलं. छावा सिनेमात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर संतोषने रायाजी ही भूमिका साकारली होती.
advertisement
7/8
दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. शूटींग दरम्यान संतोष आणि विक्की यांची खूप चांगली मैत्री झाली. संतोषने विक्की सोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से मुलाखतींमध्ये सांगितले होते.
advertisement
8/8
विक्कीला मुलगा झाल्याची बातमी संतोषला कळताच त्याने मनापासून शुभेच्छा दिल्यात. विक्कीने शेअर केलेल्या पोस्टवर संतोषने खास अंदाजाच शुभेच्छा दिल्यात. त्याने लिहिलंय, "ओयहोय.......छोटाछावा आगया. खूप खूप शुभेच्छा कौशल कुटुंबाला". संतोषने विक्की आणि कतरिनाला शुभेच्छा देत केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vicky - Katrina : ओय होय! इतका आनंद की, विक्की कतरिनाआधी संतोष जुवेकरने केलं त्यांच्या बाळाचं नामकरण; दिलं खास नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल