दिपालीचा एक प्रश्न अन् करणला अश्रू अनावर, Bigg Boss च्या घरात पहिल्यांदाच भावुक झाला Focuse Indian
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Karan Sonawane Bigg Boss Marathi 6: आजच्या भागात घरामध्ये सर्वांची लाडकी असलेली दिपाली करणची विचारपूस करताना दिसली. साध्या प्रश्नाने करणच्या मनात साठलेला बांध फुटला.
advertisement
1/7

मुंबई : 'बिग बॉस मराठी'चं घर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते राडे, एकमेकांवर चढवलेले आवाज आणि डावपेच! पण याच राड्यांच्या मागे प्रत्येक स्पर्धकाच्या मनात एक हळवा कोपरा दडलेला असतो, जो कधीतरी एकांतात किंवा जवळच्या मित्रासमोर उघडा होतो.
advertisement
2/7
सध्या सोशल मीडिया स्टार आणि घराचा डॅशिंग स्पर्धक करण सोनवणे याच्यासोबत असंच काहीसं घडलंय. घरामध्ये नेहमी सिस्टिम हँग करण्याच्या गप्पा मारणारा करण आज चक्क ढसाढसा रडताना दिसला, आणि त्याचं कारण होतं आई-वडिलांची आठवण.
advertisement
3/7
आजच्या भागात घरामध्ये सर्वांची लाडकी असलेली दिपाली करणची विचारपूस करताना दिसली. "काय रे, कसं वाटतंय घरात? मन रमतंय का?" असा साध्या प्रश्नाने करणच्या मनात साठलेला बांध फुटला.
advertisement
4/7
करण अत्यंत भावूक होत म्हणाला, "दिपाली, मला मध्येच आई-बाबांची इतकी आठवण येते की मी सांगू शकत नाही. मला फक्त एकदा त्यांचा आवाज ऐकायचा आहे. ते ठीक आहेत ना? एवढं कळलं तरी पुरेसं आहे. माझं जग त्यांच्याभोवती फिरतं आणि त्यांचं माझ्याभोवती. मला माहितीय, मी इथे आहे म्हणजे त्यांचंही जेवण जात नसेल." करणचं हे रुप पाहून दिपालीलाही स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत.
advertisement
5/7
करणने आपल्या घराच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणाला की, बाहेर असताना आजूबाजूला नेहमी माणसं असायची, सतत रिल्स बनवणं सुरू असायचं, आई-बाबांचा आवाज घरात घुमायचा. त्या गजबजलेल्या वातावरणात राहणाऱ्या मुलाला आता बिग बॉसच्या घरात तासनतास एकटं वाटू लागलं आहे.
advertisement
6/7
"मला फक्त १० सेकंद द्या, मला जाणून घ्यायचंय की ते सुखरूप आहेत," अशी आर्जव करणने कॅमेऱ्यासमोर केली. ही त्याची छोटीशी इच्छा ऐकून प्रेक्षकांचेही डोळे ओलावले आहेत.
advertisement
7/7
बिग बॉसच्या घरात जिथे प्रत्येक पाऊल मोजून-मापून टाकावं लागतं, तिथे करणने व्यक्त केलेल्या या भावना त्याच्या चाहत्यांना अधिक जवळच्या वाटत आहेत. एक मुलगा म्हणून आपल्या पालकांबद्दलची ही ओढ पाहून, करण केवळ एक उत्तम खेळाडूच नाही तर एक उत्तम माणूसही असल्याचं सिद्ध होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दिपालीचा एक प्रश्न अन् करणला अश्रू अनावर, Bigg Boss च्या घरात पहिल्यांदाच भावुक झाला Focuse Indian