Guess Who: 17 व्या वर्षी डेब्यू, 19 व्या वर्षी बनली सुपरस्टार, फ्लॉप सिनेमांमुळे अभिनयाला ठोकला रामराम!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guess the actress: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अगदी कमी वयात प्रसिद्धी चाखली. मात्र जेवढ्या लवकर यश मिळालं तेवढंच लवकर फ्लॉप आणि अपयशालाही सामोरं जावं लागलं. अशीच एक अभिनेत्री जिने कमी वयात नाव तर कमावलं मात्र फ्लॉप शिक्क्याच्या भीतीने अभिनयाला रामराम ठोकला.
advertisement
1/7

ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूज भट्ट आहे.सध्या ती फिल्म इंडस्ट्रीत दिग्दर्शिका म्हणून काम पाहते. महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री पूजा भट्ट हिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. अगदी लहान वयातच तिनं स्टारडम आणि नकार दोन्ही पाहिलं. मात्र अभिनयापासून दूर जाताच तिने दिग्दर्शनात हात आजमावला.
advertisement
2/7
90 च्या दशकात पूजा भट्ट निर्मात्यांची पहिली पसंती होती. आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर या अभिनेत्रीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं होतं. तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने चाहत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. पण वयाच्या 24 वर्षानंतर तिचं स्टारडम कमी होऊ लागलं आणि तिने अभिनय सोडून दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला.
advertisement
3/7
एक काळ असा होता जेव्हा पूजा भट्ट तिच्या स्पष्टवक्तेपणा, बोल्डनेस आणि हॉलिवूड लूकमुळे इंडस्ट्रीची शान होती. एका मोठ्या चित्रपट निर्मात्याची मुलगी असूनही तिनं खूप मेहनत करुन अभिनयाच्या दुनियेत नाव कमावलं.
advertisement
4/7
पूजा भट्टची फिल्मी कारकीर्द फार काळ टिकली नाही. एका मोठ्या चित्रपट निर्मात्याची मुलगी असूनही, अभिनेत्रीची कारकीर्द काही वेळातच कमी झाली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पूजाने याचा खुलासा केला होता. ती म्हणाला, 'मी वयाच्या 17 व्या वर्षी डॅडी हा पहिला चित्रपट केला होता. डॅडी, दिल है की मानता नहीं, सडक यांसारखे अनेक बॅक टू बॅक हिट चित्रपट दिल्यानंतर मी वयाच्या 19 व्या वर्षी सुपरस्टार झाली.
advertisement
5/7
पुढे पूजा म्हणाली, 24 वर्षांची झाली तोपर्यंत लोक म्हणाले की मी संपले. स्टारडमची उंची गाठल्यानंतरही तुमचे स्टारडम संपले असं म्हणत लोक तुम्हाला बाजूला करतील हे यावरून दिसून येतं. पण मी या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता पुढे जात राहिलो.
advertisement
6/7
पूजा भट्टच्या कारकिर्दीत जितक्या वेगाने प्रगती झाली, तितक्याच वेगाने अभिनेत्रीने तिच्या अपयशांनाही तोंड दिले. तिच्या करिअरचा आलेख इतका झपाट्याने वाढला की लोक समजू लागले की ती खूप पुढे जाईल. पण असं झालं नाही. ही अभिनेत्री अनेकदा वादातही अडकली होती. कधी मॅगझिनच्या कव्हरसाठी वडिलांना किस करून तर कधी तिच्या बोल्ड लूकने. अगदी लहान वयातच त्याला दारूचे व्यसन लागलं.
advertisement
7/7
पूजा भट्टनेही तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. 'चाहत'मध्ये तिने सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम केलं होतं. याशिवाय तिने राहुल रॉय आणि आमिर खानसोबत 'दिल है की मानता नहीं'मध्ये काम केले होते. त्यांचा हा चित्रपट खूप हिट ठरला. अभिनयाच्या दुनियेपासून दूर राहूनही त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये हात आजमावला. तिच्या दिग्दर्शनाखाली जिस्म 2, कजरारे, हॉलिडे, धोखा, पाप आणि जिस्म 3 या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: 17 व्या वर्षी डेब्यू, 19 व्या वर्षी बनली सुपरस्टार, फ्लॉप सिनेमांमुळे अभिनयाला ठोकला रामराम!