TRENDING:

महाराष्ट्राची लाडकी 'येसुबाई', शंभुराजसोबत चढणार बोहल्यावर; प्राजक्ता गायकवाडचं खरं वय माहितीय का?

Last Updated:
Prajakta Gaikwad : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा पार पडला असून ती शंभूराज खुटवडसोबत लग्न करणार आहे.
advertisement
1/7
शंभुराजसोबत बोहल्यावर चढणार प्राजक्ता गायकवाड; अभिनेत्रीचं खरं वय माहितीय का?
मुंबई: 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि 'महाराणी येसूबाई' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/7
नुकताच तिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून, ती आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
advertisement
3/7
प्राजक्ता गायकवाडला खरी ओळख 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने मिळवून दिली. या मालिकेत तिने साकारलेली 'येसूबाईं'ची भूमिका इतकी प्रभावी होती की, ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिने ज्या सहजतेने ही ऐतिहासिक भूमिका साकारली, त्यासाठी प्रेक्षक आजही तिचे कौतुक करतात.
advertisement
4/7
तिने 'आई माझी काळुबाई', 'राजमाता जिजाऊ' यांसारख्या इतर मालिकांमध्येही काम केलं आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह असते. आता तिच्या लग्नाबद्दलची बातमी ऐकून तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत आणि तिच्या नवीन प्रवासासाठी तिला शुभेच्छा देत आहेत.
advertisement
5/7
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज खुटवड आहे. शंभूराज हे एक उद्योजक असण्यासोबतच पैलवानही आहेत. त्यामुळे आता 'महाराणी येसूबाई' एका पैलवानाची जीवनसाथी होणार, अशी चर्चा सुरू आहे.
advertisement
6/7
प्राजक्ताचा जन्म ६ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला होता. आता ती २५ व्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
advertisement
7/7
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उच्चशिक्षित आहे. तिने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले आहे, जी गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी अभिमानाची आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महाराष्ट्राची लाडकी 'येसुबाई', शंभुराजसोबत चढणार बोहल्यावर; प्राजक्ता गायकवाडचं खरं वय माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल