Shamita Shetty: राकेश बापटसोबत ब्रेकअप, 47 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडली शमिता शेट्टी, 'या' हँडसम हंकला करतेय डेट?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shamita Shetty Boyfriend: शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असताना अभिनेता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती. या दोघांची जोडी 'शारा' या नावाने प्रचंड गाजली.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्यात जोडप्यांनी वयाची बंधनं तोडून स्वतःचं विश्व निर्माण केलं. आता या यादीत आणखी एका ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. ती म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी.
advertisement
2/8
४७ व्या वर्षी शमिता आयुष्यात पुढे जात असून पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात प्रेमाने चाहूल दिल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये रंगली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे शमिताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही खास फोटो.
advertisement
3/8
शमिता शेट्टीने नुकताच आपला वाढदिवस अत्यंत दिमाखात साजरा केला. या पार्टीला बहीण शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. मात्र, या गर्दीत एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, ती व्यक्ती म्हणजे दीपेश शर्मा.
advertisement
4/8
दीपेशने शमितासोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, "मला नेहमी हसवणाऱ्या आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माहीत असूनही माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आय लव्ह यू शैमस्टर!" यासोबत त्याने लाल रंगाचं हार्ट इमोजीही टाकलं आहे.
advertisement
5/8
ज्या दीपेश शर्मासोबत शमिताचं नाव जोडलं जात आहे, तो ग्लॅमरस दुनियेतील असला तरी त्याचा पेशा थोडा वेगळा आहे. दीपेश हा एक प्रसिद्ध टेक्नो आर्टिस्ट आहे. शमिताच्या घरगुती कार्यक्रमात असलेली त्याची हजेरी पाहता, ही केवळ मैत्री आहे की मैत्रीच्या पलीकडचं काही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
6/8
दीपेशने ज्या हक्काने शमिताला 'लव्ह यू' म्हटलं आहे, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
advertisement
7/8
शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असताना अभिनेता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती. या दोघांची जोडी 'शारा' या नावाने प्रचंड गाजली. मात्र, काही काळाने त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शमिता सिंगल होती. मात्र, आता दीपेशच्या एन्ट्रीने शमिता पुन्हा एकदा आनंदी दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो सर्व काही सांगून जात आहे.
advertisement
8/8
शमिताने २००० मध्ये 'मोहब्बतें' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जहर', 'बेवफा', 'फरेब' आणि 'कॅश' यांसारख्या चित्रपटांत तिने काम केलं. अभिनयासोबतच ती आपल्या फिटनेस आणि डान्ससाठीही ओळखली जाते.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shamita Shetty: राकेश बापटसोबत ब्रेकअप, 47 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडली शमिता शेट्टी, 'या' हँडसम हंकला करतेय डेट?