TRENDING:

रोहित शेट्टीनंतर गोविंदावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावला अभिनेता, मॅनेजरने सांगितला पहाटे 4 वाजताचा थरार

Last Updated:
Govinda : रुपेरी पडद्यावर आपल्या डान्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या गोविंदाच्या खऱ्या आयुष्यात मात्र सध्या दहशतीचं वातावरण आहे.
advertisement
1/7
रोहित शेट्टीनंतर गोविंदावर जीवघेणा हल्ला, मॅनेजरने सांगितला पहाटे 4 वाजताचा थरार
बॉलिवूडचा लाडका 'हिरो नंबर १' अर्थात गोविंदा सध्या एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक कारणाने चर्चेत आला आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या डान्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या गोविंदाच्या खऱ्या आयुष्यात मात्र सध्या दहशतीचं वातावरण आहे.
advertisement
2/7
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाला गेल्या काही दिवसांपासून सतत धमकीचे फोन येत असून नुकताच त्यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या थरारामुळे सिनेविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/7
मॅनेजर शशी सिन्हा यांनी 'एएनआई'शी बोलताना या घटनेचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, काही अज्ञात हल्लेखोर गोविंदाच्या घरापर्यंत पोहोचले होते. सुदैवाने, स्वतःच्या संरक्षणासाठी गोविंदाकडे त्यांची लायसन्स असलेली बंदूक होती.
advertisement
4/7
शशी सिन्हा म्हणाले, "त्या रात्री पहाटे ४ च्या सुमारास काही संशयास्पद लोक बंगल्याबाहेर दिसले. देवाची कृपा म्हणून गोविंदा सरांकडे बंदूक होती. त्यांनी ती हल्लेखोरांना दाखवताच ते पळून गेले. जर त्यांच्याकडे शस्त्र नसतं, तर त्या रात्री काय झालं असतं, याचा विचार करूनही अंगावर काटा येतो."
advertisement
5/7
ही घटना समजताच शशी सिन्हा तातडीने गोविंदाच्या घरी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांत रितसर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
advertisement
6/7
या प्रसंगात स्वतःचा जीव वाचवताना गोविंदाला दुखापत झाल्याची माहितीही मॅनेजरनी दिली आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर आता गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, खुद्द गोविंदाने अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
7/7
२०२४ मध्येही गोविंदा गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आले होते. त्यावेळी आपली रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून सुटलेली गोळी त्यांच्या पायाला लागली होती. पोलिसांनी त्या घटनेचा सखोल तपास करून ती एक दुर्घटना असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावेळी गोविंदाने एक व्हॉईस नोट प्रसिद्ध करून चाहत्यांचे आभार मानले होते. मात्र, आताची ही घटना दुर्घटना नसून थेट हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रोहित शेट्टीनंतर गोविंदावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावला अभिनेता, मॅनेजरने सांगितला पहाटे 4 वाजताचा थरार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल