Ranveer Singh: स्टारडमचा गैरवापर? 'धुरंधर'साठी रणवीर सिंगने वापरल्या 3 व्हॅनिटी व्हॅन, अखेर समोर आलं शॉकिंग कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ranveer Singh in Dhurandhar: धुरंधर' या चित्रपटाच्या यशासोबतच एका वेगळ्या वादाने डोके वर काढले होते, ते म्हणजे रणवीर सिंगच्या लक्झरी सुविधा.
advertisement
1/7

मुंबई : बॉलिवूडचा एनर्जी बॉम्ब रणवीर सिंग आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने यशाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पण चित्रपटाच्या यशासोबतच एका वेगळ्या वादाने डोके वर काढले होते, ते म्हणजे रणवीर सिंगच्या लक्झरी सुविधा.
advertisement
2/7
'धुरंधर'च्या एंड क्रेडिट्समध्ये रणवीरच्या नावाखाली चक्क तीन व्हॅन्सचा उल्लेख दिसल्याने, "एका अभिनेत्याला तीन-तीन व्हॅनिटी व्हॅन कशासाठी?" असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता या अफवांचे सत्य समोर आले असून रणवीरची बदनामी करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले आहे.
advertisement
3/7
रेडिटवर एका युजरने स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये 'हम्झा व्हॅन', 'हम्झा स्टाफ व्हॅन' आणि 'हम्झा नॉर्मल व्हॅन' असे उल्लेख होते. यावरून रणवीर सेटवर प्रचंड चैन करतो, असा समज पसरला. मात्र, चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॅनिटी व्हॅन नसून थायलंडमधील थाई व्हॅन्स म्हणजेच सामान्य वाहतूक गाड्या होत्या.
advertisement
4/7
बँकॉकचे शूटिंग अत्यंत धावपळीचे होते. एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर सतत फिरावे लागत असल्याने, अभिनेता, त्यांचा स्टाफ आणि शूटिंगचे साहित्य नेण्यासाठी या गाड्यांची गरज होती. त्यामुळे रणवीरने कोणतीही अतिरिक्त लक्झरी मागितली नव्हती, तर ती केवळ कामाची गरज होती.
advertisement
5/7
रणवीर सिंगने 'हम्झा' या पात्रासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन केलं, ते पाहून कोणाचेही डोळे विस्फारतील. सूत्रांनी सांगितले की, चित्रपटाच्या मागणीनुसार रणवीरने कधी २५ किलो वजन वाढवले, तर कधी अवघ्या काही दिवसांत १५ किलो वजन घटवले.
advertisement
6/7
दिवसाचे १२ ते १४ तास शूटिंग आणि सोबतीला हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन! अशा वेळी सेटवर जिम, डाएट फूड आणि खाजगी शेफ असणे ही चैन नसून कामाचा भाग आहे. ही शिस्त पाळली नसती, तर कदाचित आपल्याला पडद्यावर असा दमदार 'हम्झा' पाहायला मिळाला नसता.
advertisement
7/7
आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे, 'धुरंधर' आणि त्याचा पुढचा भाग 'धुरंधर: द रिव्हेंज' यांचे शूटिंग एकाच वेळी करण्यात आले होते. मुळात हा एकच मोठा चित्रपट होता, पण लांबी जास्त असल्याने दिग्दर्शकाने त्याचे दोन भाग केले. आता सीक्वलचा टीझर आल्यापासून रणवीरचा 'डार्क आणि शार्प' अवतार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ranveer Singh: स्टारडमचा गैरवापर? 'धुरंधर'साठी रणवीर सिंगने वापरल्या 3 व्हॅनिटी व्हॅन, अखेर समोर आलं शॉकिंग कारण