Allu Arjun : अनेक जण म्हणतात अशुभ पण अल्लू अर्जुनसाठी लकी आहे 666 नंबर, काय कनेक्शन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
666 अनेक जण हा नंबरला अशुभ मानतात. पण अल्लू अर्जुनसाठी हा नंबर लकी ठरला आहे. काय आहे कनेक्शन?
advertisement
1/7

पुष्पा फेम साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या दमदार अभिनय आणि युनिक डान्स स्टाइलने जगभरात ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुनला स्टायलिश स्टार म्हणून ओळखलं जातं. अभिनेत्याने पॅन-इंडिया लेव्हलवर प्रचंड लोकप्रिय आहे. पडद्यावर जितका अॅग्रेसिव्ह दिसतो तितकाच तो खऱ्या आयुष्यात शांत आणि साध्या स्वभावाचा आहे.
advertisement
2/7
अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी चेन्नईमध्ये झाला. तो फिल्मी कुटुंबातून येतो. त्याचे वडील अल्लू अरविंद हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. 2003 मध्ये 'गंगोत्री' या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. 'आर्या' या चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळवून दिली.
advertisement
3/7
पुष्पा हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाने त्याला पॅन-इंडिया सुपरस्टार बनवलं. 'झुकेगा नहीं साला' हा त्याचा डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
advertisement
4/7
अल्लू अर्जुनच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झालं 666 हा नंबर त्याचा अत्यंत जवळचा नंबर आहे. अनेक जण हा नंबरला अशुभ मानतात. पण अल्लूसाठी हा नंबर लकी ठरला आहे. त्याच्याकडे असलेल्या अनेक लक्झरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर 666 नंबर दिसून येतो.
advertisement
5/7
फक्त गाड्यांपुरतंच नाही तर त्याच्या मोबाईल नंबरमध्येही 666 असतो. त्याच्या एका मर्सिडीज कारचा नंबरही 666 होता. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं की, हा नंबर त्याला शांतता देतो. काही लोक या नंबरकडे वेगळ्या नजरेने पाहतात मात्र अल्लू अर्जुनसाठी हा नंबर सकारात्मक आहे.
advertisement
6/7
666 नंबरला अनेकजण अशुभ मानतात. काही एक्सपर्ट्सनुसार 6 हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. जो लक्झरी, आकर्षण आणि यशाचं प्रतीक मानला जातो. कदाचित याच कारणामुळे काही लोक हा नंबर लकी मानतात.
advertisement
7/7
अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत बोलायचं झाल्यास त्याच्याकडे जवळपास 350 ते 400 कोटींच्या घरात संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. तो एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतो. हैदराबादमध्ये त्याचा आलिशान बंगला असून त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Allu Arjun : अनेक जण म्हणतात अशुभ पण अल्लू अर्जुनसाठी लकी आहे 666 नंबर, काय कनेक्शन?