TRENDING:

Amruta Khanvilkar : 'अमूल्य', माझं बाळ! महिला दिनी अमृता खानविलकरने दिली गोड बातमी

Last Updated:
Amruta Khanvilkar Amulya : अभिनेत्री अमृता खानविलकरने महिला दिनी गोड बातमी देत 'अमूल्य'ची ओळख सगळ्यांना करून दिली आहे.
advertisement
1/7
'अमूल्य', माझं बाळ!  महिला दिनी अमृता खानविलकरने दिली गोड बातमी
गेले काही दिवस अमूल्य बाय अमृता अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. अमृता खानविलकरशी संबंधित ही पोस्ट. हे अमूल्य नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न कित्येकांना पडला. दरम्यान आता महिला दिनी अमृता खानविलकरने अखेर त्या अमूल्यचं रहस्य उलगडलं आहे.
advertisement
2/7
अमूल्य माझं बाळ आहे, माझ्यावर जितकं प्रेम केलंत तितकंच प्रेम तुम्ही माझ्या या छोट्या बाळावर कराल, असं म्हणत अमृताने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल आहे.
advertisement
3/7
अमूल्य, अमृताचं हे छोटं बाळ म्हणजे तिने केलेली एक नवीन सुरुवात. आता उद्योजक म्हणून एक नवं पाऊल टाकत तिने स्वतःचा साडी ब्रँड सुरू केला आहे. 'अमूल्य असं या ब्रँडच नाव असून हा ब्रँड अमृताने महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर लाँच केला आहे.
advertisement
4/7
अमृता म्हणाली, "माझ्यासाठी साडी कधीच फक्त एक कपडा नव्हता ती भावना, आठवणी आणि ओळख घेऊन येते. लहानपणापासून मी महिलांना साडीत दिसणारी त्यांची सुंदरता आणि ग्रेस पाहत मोठी झाले आहे. कालांतराने साड्यांशी माझा एक खूप वैयक्तिक संबंध निर्माण झाला"
advertisement
5/7
अमृता पुढे म्हणाली, "त्या प्रवासात कुठेतरी मला या क्षेत्रात स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची इच्छा झाली जे एलिगन्स, परंपरा आणि उबदारपणा दर्शवेल. हाच विचार हळूहळू अमूल्य'मध्ये रूपांतरित झाला आहे"
advertisement
6/7
"अमूल्य या नावाचा अर्थच अमूल्य, म्हणजेच अनमोल असा आहे. हा केवळ फॅशन ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न नसून साड्यांमध्ये दडलेल्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यासाठी प्रत्येक साडी, तिच्यामागे कथा, कौशल्य आणि भावनिक नातं दडलेलं आहे", असं तिने सांगितलं.
advertisement
7/7
आजपर्यंत तुम्ही माझ्या कामावर जसं प्रेम केलंत. तसंच 'अमूल्य बाय अमृता' या माझ्या छोट्या बाळावर तुम्ही खूप प्रेम कराल, अशी आशा तिने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amruta Khanvilkar : 'अमूल्य', माझं बाळ! महिला दिनी अमृता खानविलकरने दिली गोड बातमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल