महाराष्ट्राचा सुपरस्टार 17 वर्षांनी दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'साडे माडे 3'च्या सिक्वेलची घोषणा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
साडे माडे तीन या प्रसिद्ध मराठी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अभिनेता पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भुमिकेत दिसणार आहे.
advertisement
1/5

अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे अशी मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट एका सिनेमात दिसली होती तो सिनेमा म्हणजे साडे माडे तीन.
advertisement
2/5
अभिनेता अंकुश चौधरी यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सिनेमाची उत्तम कथा, दमदार स्टारकास्ट आणि सुंदर गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कुरळे ब्रदर्सनी सिनेमात धम्माल उडवली होती.
advertisement
3/5
तब्बल 17 वर्षांनी अंकुश चौधरी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. अंकुश चौधरी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहे. या सिनेमातून अंकुशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं.
advertisement
4/5
साडे माडे तीन सिनेमातील कलाकारांचे कॉस्च्युम्स आणि लुक्स आजही फेसम आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर, अरुण नलावडे, सुमीत राघवन हे कलाकारही महत्त्वाच्या भुमिकेत
advertisement
5/5
या सिनेमाबद्दल बोलताना अंकुश चौधरी म्हणाला, "साडे माडे तीनच्या सिक्वेलचची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. एखाद्या सिनेमाचा दुसरा पार्ट चेणं हे खूप जबाबादारीचं काम आहे. साडे माडे तीनवर प्रेक्षकांनी तेव्हा जसं प्रेम केलं होतं तितकंच ते आताही करतील अशी खात्री आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महाराष्ट्राचा सुपरस्टार 17 वर्षांनी दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'साडे माडे 3'च्या सिक्वेलची घोषणा