पाकिस्तानमध्ये आहे अनुष्का शर्माची डुप्लिकेट, बाबर आझमला करतेय डेट? सौंदर्य पाहून व्हाल अवाक
- Published by:Shreyas
Last Updated:
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधलं 50वं शतक झळकवलं आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटचं हे ऐतिहासिक शतक पाहण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये उपस्थित होती. या वर्ल्ड कपमध्ये विराटसोबत अनुष्का शर्माही चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
1/6

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सौंदर्यवतीही लाईमलाईटमध्ये आली आहे. या सौंदर्यवतीचं नाव आहे हानिया आमीर, जिला अनुष्का शर्माची डुप्लिकेट म्हणूनही म्हणलं जातं.
advertisement
2/6
सोशल मीडियावर चाहते हानिया आणि अनुष्का शर्माच्या फोटोंचा कोलाज बनवून दोघींची तुलना करत आहेत.
advertisement
3/6
हानिया आमीर पेशाने पाकिस्तानी अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर हानिया आमीरचं फॅन फॉलोईंगही मोठ्या प्रमाणावर आहे.
advertisement
4/6
हानिया आमीरचं नाव पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझमशीही जोडलं जात आहे. बाबर आणि हानिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
advertisement
5/6
वर्ल्ड कप दरम्यान हानिया आणि बाबरचे जुने इंटरव्ह्यूजही व्हायरल झाले, यात दोघांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. यानंतरच दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
advertisement
6/6
हानिया आमीर पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे, तिने हमसफर, तितली, फिर वही मोहब्बत यासारख्या पाकिस्तानी शो मध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाकिस्तानमध्ये आहे अनुष्का शर्माची डुप्लिकेट, बाबर आझमला करतेय डेट? सौंदर्य पाहून व्हाल अवाक