लोणावळ्याचा प्लॅन शेवटचा ठरला! सिनेमा अन् पहाटेचा सूर्योदय; पवई IITच्या 3 मित्रांचा करुण अंत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पनवेलजवळ आयआयटी पवईच्या तीन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू. ओम कुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार जागीच ठार. चौथा मित्र गंभीर जखमी. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर.
advertisement
1/8

पनवेल, प्रतिनिधी विश्वनाथ सावंत: मज्जा मस्ती, पाहिलेल्या सिनेमावर चर्चा आणि गाडीत सुरू असलेली गाणी, खिदळत मित्रांची मजा सुरू होती. मात्र नियती असा विचित्र घात करे असं कुणाच्या मनात नव्हतं. रक्त सळसळतं आणि गाडी चालवण्याचा जोश, त्यामुळे गप्पांच्या नादात गाडीनं कधी स्पीड घेतला ते समजलंच नाही आणि अचानक होत्याचं नव्हतं झालं. कारचा चुराडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. कारचा अक्षरश: चक्का चूर झाला. एका क्षणात सगळं संपली.
advertisement
2/8
हसण्या खिदळण्याचे आवाज थांबले आणि जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर एकदम सगळं शांत. ही शांतता अंगावर काटा आणणारी होती. ज्यांनी हा अपघात पाहिला त्यांची तर झोपच उडाली. आयआयटी पवईमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात मृत्यू झाला.
advertisement
3/8
रात्री उशिरा सिनेमा पाहून झाल्यानंतर पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी लोणावळ्याला गेलेल्या या मित्रांच्या गाडीला भातान बोगद्याजवळ अपघात झाला. या घटनेमुळे आयआयटी कॅम्पससह नाशिक, नागपूर आणि जयपूरमधील त्यांच्या कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला.
advertisement
4/8
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईतील सहा मित्र दोन-तीन गाड्यांमधून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहिल्यानंतर, सूर्योदय पाहण्याचा बेत त्यांनी आखला. लोणावळ्याचा फेरफटका मारून हे सर्वजण १८ मार्चच्या पहाटे लोणावळ्याच्या दिशेनं जात असताना भातान बोगदा ओलांडल्यानंतर अवघ्या दीड किलोमीटरवर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
advertisement
5/8
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार लेन क्रमांक २ वरून वेगाने जात होती. समोर असलेल्या एका मोठ्या कंटेनरला सर्व्हिस लेनमधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न चालकाने केला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने कार थेट कंटेनरच्या मागील भागावर जाऊन आदळली.
advertisement
6/8
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात ओम कुमार बोरसे (नाशिक), श्रेयांश शर्मा (जयपूर) आणि लय देशभ्रतार (नागपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवून सर्वांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
advertisement
7/8
या अपघातात त्यांचा चौथा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरुण अत्यंत हुशार आणि देशातील नामांकित संस्थेत शिक्षण घेत होते. एका रात्रीच्या सहलीचा असा भयानक शेवट होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.
advertisement
8/8
नाशिक आणि नागपूरच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बोसरे आणि देशभ्रतार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. ह्या फोटोंवरुनच अपघाताची भीषणता किती असेल याचा अंदाज येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
लोणावळ्याचा प्लॅन शेवटचा ठरला! सिनेमा अन् पहाटेचा सूर्योदय; पवई IITच्या 3 मित्रांचा करुण अंत