43 व्या वर्षीही अविवाहित! सुपरस्टार्स ते बिझनेसमशी जोडलेलं नाव, आज इतक्या कोटींची मालकीण आहे 'देवसेना'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Anushka Shetty Networth : बाहुबलीमधील राजकुमारी देवसेना आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. हीच देवसेना खऱ्या आयुष्यात खूप श्रीमंत आहे. तिच्या लव्ह लाइफची चर्चा नेहमीच होत असते.
advertisement
1/8

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त झाली आहे. झीनत अमान, रेखापासून ते सुष्मिता सेनपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या प्रेमप्रकरणांनी त्यांच्या चित्रपटांसह चर्चेतही स्थान मिळवले आहे. पण तुम्हाला ती सुंदर अभिनेत्री जिचे नाव सुपरस्टार, क्रिकेटपटू आणि अगदी दोन व्यावसायिकांशी जोडले गेले आहे? वयाच्या 43व्या वर्षीही तिचं सौंदर्य तितकंच चिरतरूण आहे.
advertisement
2/8
5 फूट 10 इंच उंची, पाहणाऱ्याला मोहित करणारी सुंदरता, लांब केस आणि देखणा स्वभाव... या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. 120 कोटी रुपयांची ही मालकीण आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या अफेअर्सच्या चर्चांमुळेही नेहमीच चर्चेत पाहिली.
advertisement
3/8
आपण जिच्याविषयी बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. इंडस्ट्रीत तिला स्वीटी शेट्टी असंही म्हणतात. अनुष्काचा अभिनेत्रीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. ती इंडस्ट्रीतील एक उच्चशिक्षित व्यक्ती आहे. तिने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी मिळवली. योगाचंही शिक्षण तिनं घेतलं आहे.
advertisement
4/8
अनुष्का शेट्टीने 2005 मध्ये 'सुपर' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती 'लक्ष्यम' आणि 'शोर्यम' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे एसएस राजामौली यांचe बाहुबली. या मालिकेतील 'राजकुमारी देवसेना' या भूमिकेसाठी तिने खूप लक्ष वेधले. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिला 'क्वीन ऑफ द इंडस्ट्री' म्हणूनही ओळखले जाते.
advertisement
5/8
शोबिझमध्ये हे सामान्य असले तरी, सह-कलाकार आणि क्रिकेटपटूंमधील संबंध सामान्य आहेत. 43 वर्षांची अनुष्का शेट्टीही त्याला अपवाद नाही. तिचे नावही सह-कलाकारांशी, तसेच क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांशीही जोडलं गेलं होतं.
advertisement
6/8
अनुष्काचं नाव आतापर्यंत नाव प्रभास, नागा चैतन्य, क्रिश जगरलामुडी आणि गोपीचंद, तसेच क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि दोन व्यावसायिकांशी जोडलं गेलं होतं. अनुष्काने मात्र कधीच यावर भाष्य केलं नाही की कधी त्याला दुजोरा दिला नाही. बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आणि प्रभासच्या अफेअरच्या बातम्या लग्नापर्यंत पोहोचल्या होत्या.
advertisement
7/8
क्रिकेटर राहुल द्रविड तिचा क्रश असल्याचं तिनं सांगितलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर तिचं नाव या क्रिकेटपटूशी जोडले आहे. अनुष्काचे आतापर्यंत 7 अफेअर्स होते असं म्हणतात. ती वयाच्या 43 व्या वर्षी अविवाहित आहे. ती अजूनही सिंगल का आहे असा प्रश्न तिच्या लाखो चाहत्यांच्या मनात आहे.
advertisement
8/8
अनुष्का बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. एका चित्रपटासाठी ती जवळपास 4-5 कोटी रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार,अनुष्का शेट्टीची एकूण संपत्ती 110 ते 120 कोटी रुपयांहून अधिक आहे. तिच्या लग्झरी कारचं कलेक्शन आहे. ती नेहमी बीएमडब्ल्यू आणि ऑडी क्यू 5 मधून फिरताना दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
43 व्या वर्षीही अविवाहित! सुपरस्टार्स ते बिझनेसमशी जोडलेलं नाव, आज इतक्या कोटींची मालकीण आहे 'देवसेना'