मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 04615 आणि 04716 साईनगर शिर्डी–बिकानेर–साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मार्गावर एकूण दहा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, शिर्डी दर्शनासाठी तसेच राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
खडकी-हिसार साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 04725 आणि 04726 हिसार–खडकी–हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्या 26 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या मार्गावर एकूण आठ फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून, उत्तर भारत आणि पुणे परिसरातील औद्योगिक व लष्करी भागाशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
अजमेर-दौंड गाडीला मुदतवाढ
गाडी क्रमांक 09625 आणि 09626 अजमेर–दौंड–अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या 30 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. दौंड हे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असल्याने मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील प्रवाशांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
अजमेर-सोलापूर गाडी 29 जानेवारीपर्यंत
गाडी क्रमांक 09627 आणि 09628 अजमेर–सोलापूर–अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना 29 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या मार्गावर एकूण आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे धार्मिक, व्यावसायिक तसेच कौटुंबिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि थांब्यांची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकावरून घेण्याचे आवाहन केले आहे. वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.






