TRENDING:

AR Rahman : संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावर चोरीचा आरोप; सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Last Updated:
AR Rahman : संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावर चोरीचा आरोप करत तक्रारदाराने हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायलयाने याप्रकरणी सुनावणी घेतली.
advertisement
1/5
संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावर चोरीचा आरोप; सुप्रीम कोर्टाने दिला दणका
प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. एआर रहमान यांनी चोरी केल्याची तक्रार घेऊन तक्रारदार सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यावर सुनावणी घेतली आहे.
advertisement
2/5
ध्रुपद शैलीतील भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी एआर रहमान यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं कीए.आर. रहमान यांनी मणिरत्नम यांची 2023 मध्ये रिलीज झालेली तमिळ फिल्म 'पोन्नियिन सेल्वन 2' मधील 'वीरा राजा वीरा' या गाण्यात त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या रचना 'शिव स्तुती' चा काही भाग चोरला आहे. 
advertisement
3/5
त्यांनी ध्रुपद गायन किंवा संपूर्ण बंदिश गायनावर मालकी असल्याचा दावा केला नाही. पण एक खास प्रकारचं सूल ताल जे आमचं आहे. ते सहसा चौतालमध्ये गायलं जातं. ही शैली अमीर खुसरो यांनी सुमारे 800 वर्षांपूर्वी तयार केली होती. पण डागर शैलीमध्ये ते सूल तालमध्ये गायलं जातं असं त्यांनी सांगितलं. 
advertisement
4/5
सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेतली आणि म्हटलं की, संपूर्ण जगाला डागर कुटुंब आणि त्यांच्या ध्रुपद संगीताबद्दल माहिती आहे. ते पिढ्यानपिढ्या अत्यंत प्रतिष्ठित कलाकार आहेत. जर त्यांनी भारतीय संगीतात मोठं योगदान दिलं असतं, तर आजचे मॉडर्न गायक बाजारात टिकले असते का?
advertisement
5/5
पहिलं गाणं गायलं म्हणजे तो त्याचा संगीतकार झाला असं नाही. खरा संगीतकार कोण हे आम्हाला तपासायचं आहे. असा ताल याआधी नव्हता हे सिद्ध करावं लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे, आता 20 फेब्रुवारीला या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
AR Rahman : संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावर चोरीचा आरोप; सुप्रीम कोर्टाने दिला दणका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल