TRENDING:

'त्याच्यासाठी सर्वस्व दिलं, तो लाथेनं मारायचा', Bigg Boss गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं सांगितला भयानक भूतकाळ

Last Updated:
Bigg Boss फेम अभिनेत्रीनं तिच्या त्रासदायक रिलेशनशिपचा अनुभव शेअर केला, कुटुंबाच्या साथीनं ती त्यातून बाहेर आली. ज्याच्यासाठी सगळं काही केलं त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तिनं सांगितलं.
advertisement
1/7
'त्याच्यासाठी सर्वस्व दिलं, तो लाथेनं मारायचा',अभिनेत्रीनं सांगितला भयानक भूतकाळ
बिग बॉस फेम मॉडेल, अभिनेत्री अर्चना गौतम सध्या The 50 शोमध्ये आहे. तिचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. तिचा आवाज सगळ्यांना इरिटेड करतो पण ती एकदा हसू लागली की इतरांना हसू आवरत नाही.
advertisement
2/7
आज इतकी कॉन्फिडन्स आणि हसणारी अर्चना तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी सहन करून इथवर आली आहे. अर्चनाने The 50मध्ये तिच्या एका रिलेशनबद्दल सांगितलं. त्या रिलेशनमध्ये तिने प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन केला.
advertisement
3/7
ज्याच्यासाठी तिनं सर्वस्व दिलं त्याने मात्र तिला तुच्छ वागणूक आणि मारहाण केली. तिच्या कुटुंबानं तिला साथ दिली आणि सगळ्यातून बाहेर पडून तिनं तिचं करिअर केलं.
advertisement
4/7
The 50 मध्ये अभिनेत्री युविका चौधरीशी बोलताना अर्चनाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "इथे सगळ्यात गोष्टींमध्ये मी बोल्ड दिसते. पण प्रेमात मी इमोशनल होते. तो इतका गुड लुकींग नव्हता. मी त्याला हिरो बनवलं. मी त्याच्या बहिणीचं संपूर्ण ग्रुमिंग केलं."
advertisement
5/7
"मी चोवीस तास फक्त त्याच्याबरोबर असायचे. त्याच्यासाठी सगळं करायचे. त्या काय खायचं आहे त्याला कोणते कपडे घालायचे आहेत. मी त्याच्यासाठी 100 जोडी कपडे आणले. इतकं सगळं करून मला काय मिळालं फक्त मार."
advertisement
6/7
युविकाने तिला सल्ल देत म्हटलं, "हे प्रेम नसतं. कोणी तुला चपलेनं मारणार हे प्रेम असतं? आयुष्यात तू तुझी मेंटल हेल्थ गमावून बसण्याआधी तुला तुझ्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. तू जेव्हा स्वत:वर प्रेम करशील तेव्हा जग बदलेल. सगळ्या गोष्टी आपोआप तुझ्याकडे येतील." अर्चना म्हणाली, "मी माझी मेंटल हेल्थ गमावून बसले होते आता मी त्यातून बाहेर आले आहे."
advertisement
7/7
अर्चनाने सांगितलं की तो तिला लाथेनं मारायचा. ती म्हणाली, तो मला मारायचा तेव्हा मी ओरडायचे, सगळ्यांना बोलवेन असं म्हणायचे तेव्हा तो आणखी मारायचा. एकदा तो एका मुलीला घेऊन आला आणि तिच्यासमोर त्याने अर्चनाला मारलं. ती मुलगी घाबरून पळून गेली असंही अर्चनाने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याच्यासाठी सर्वस्व दिलं, तो लाथेनं मारायचा', Bigg Boss गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं सांगितला भयानक भूतकाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल