Planet February 2026: आकाशात सहज डोळ्यांनी दिसेल अद्भुत खगोलीय घटना! 28 फेब्रुवारी 6 ग्रह एका लाईनीत..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Planet Parade February 2026: येत्या 28 फेब्रुवारी 2026, शनिवारच्या संध्याकाळी आकाशात एक अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे. या दिवशी सूर्य मावळल्यानंतर सौरमंडळातील 6 महत्त्वाचे ग्रह एका रांगेत दिसणार आहेत, ज्याला 'प्लॅनेट परेड' असं म्हणतात. खगोलप्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानीच असणार आहे. या दुर्मिळ घटनेबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
advertisement
1/6

कधी आणि कुठे पाहायची ही ग्रहांची रांग?सूर्य मावळल्यानंतर साधारण 30 ते 60 मिनिटांनी हा नजारा स्पष्ट दिसायला लागेल. म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही हे दृश्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला पश्चिम दिशेला (जिथे सूर्य मावळतो) क्षितिजाकडे पाहावं लागेल.
advertisement
2/6
आकाशात कोणते ग्रह दिसतील?या प्लॅनेट परेडमध्ये बुध (Mercury), गुरू (Jupiter), युरेनस (Uranus), शनी (Saturn), शुक्र (Venus) आणि नेपच्यून (Neptune) हे सहा ग्रह सहभागी होणार आहेत.
advertisement
3/6
हे दृश्य कसं ओळखायचं?पश्चिम दिशेला पाहिलं की सर्वात आधी तुम्हाला शुक्र आणि बुध दिसतील. त्यांच्या थोडं वर शनी आणि नेपच्यून असतील, तर त्यांच्याही वर युरेनस पाहायला मिळेल. या संपूर्ण रांगेत गुरू ग्रह सर्वात जास्त प्रकाशमान आणि उठावदार दिसेल.
advertisement
4/6
ग्रहांची परेड म्हणजे ?जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह आकाशात एकाच दिशेला जवळ जवळ दिसतात, तेव्हा त्याला 'प्लॅनेट परेड' म्हटलं जातं. प्रत्यक्षात हे ग्रह एकमेकांपासून कोट्यवधी किलोमीटर लांब असतात, पण पृथ्वीवरून पाहताना ते एकाच रांगेत किंवा झुंडीत असल्यासारखे वाटतात.
advertisement
5/6
भारतातून कसं दिसेल?भारतातून तुम्ही साध्या डोळ्यांनी फक्त चार ग्रह पाहू शकाल. बाकीच्या ग्रहांना पाहण्यासाठी टेलिस्कोपची मदत घ्यावी लागेल. शुक्र ग्रह सर्वात जास्त चमकेल, त्यामुळे तो ओळखणं खूप सोपं असेल. गुरू ग्रह सुद्धा स्पष्टपणे दिसेल. मात्र युरेनस, नेपच्यून आणि बुध पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीची गरज भासू शकते.
advertisement
6/6
हा नजारा पाहण्यासाठी काही टिप्स: हे दृश्य पाहण्यासाठी प्रदूषण नसलेली आणि मोकळी जागा निवडा. शहराच्या गर्दीपासून थोडं दूर गेलात तर आकाश जास्त स्पष्ट दिसेल. तुमच्याकडे DSLR कॅमेरा किंवा चांगला स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा क्षण कैद करू शकता. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणाची गरज नाही, तुम्ही साध्या डोळ्यांनीही याचा आनंद घेऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Planet February 2026: आकाशात सहज डोळ्यांनी दिसेल अद्भुत खगोलीय घटना! 28 फेब्रुवारी 6 ग्रह एका लाईनीत..