असा योग अंगाशी आला! सोशल मीडिया स्टारविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. अशाच एका अभिनेत्रीनं तिचे फोटो शेअर केलेत. ज्यात ती सुवर्ण मंदिरात योगा करताना दिसत आहे. या फोटोंमुळे नवा वाद निर्माण झाला असून अभिनेत्री चांगलीच अडचणीत आली आहे.
advertisement
1/7

अर्चना मकवाना असं अभिनेत्री नाव असून ती फॅशन डिझाइनर देखील आहे. अभिनेत्री नुकतीच पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गेली होती. या मंदिरात जात तिनं योगा करुन त्याचे फोटो शेअर केलेत.
advertisement
2/7
अभिनेत्रीनं सुवर्ण मंदिरात योगा केल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तिच्याविरोधात पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मागे घ्यावी अशी विनंती अभिनेत्रीनं केली आहे.
advertisement
3/7
अर्चना विरोधात कलम 296 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून बुजून धार्मिक भावना भडकवणे आणि अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं गेलं आहे. अर्चना ही सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर देखील आहे. ती मुळची वडोदऱ्याची राहणारी आहे.
advertisement
4/7
या फोटोंनंतर अर्चनाला धमक्यांचे फोन आणि मेसेज आले आहेत. यानंतर पोलिसांनी तिला सुरक्षा देखील देखील आहे. दरम्यान सुवर्ण मंदिरात योगा केल्यानं धार्मिक भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात असा प्रश्न अभिनेत्रीनं केला आहे.
advertisement
5/7
अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "21 जूनला जेव्हा मी सुवर्ण मंदिरात शीर्षासन करत होते तेव्हा हजारो शिख लोक मला पाहत होते. त्यातील एकानही मला अडवलं नाही. इककंच नाही तर ज्यांनी माझे फोटो क्लिक केले ते स्वत: सरदारजी होती. त्यांना हे अपमानजनक वाटलं नाही. ते नाराज झाले नाहीत. मग आता असं का होत आहे असा प्रश्न मला पडला आहे. सुवर्ण मंदिरात योगा केल्यानं धार्मिक भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात?"
advertisement
6/7
न्यूज 18 इंग्लिशशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, "जे लोक नियमित मंदिरात जातात त्यांना तिथले नियम माहिती नसतात. मग पहिल्यांदा पंजाबमध्ये आलेल्या मुलीकडून तुम्ही अशी अपेक्षा कशी करू शकता. मला नाही माहिती की SGPC ट्रस्टचा प्रपोगंडा काय आहे".
advertisement
7/7
अभिनेत्री पुढे म्हणाली, "पण मी पीडितेचं दु:ख सहन करत आहे. माझ्याविरोधात तक्रार मागे घ्यायला हवी. माझं म्हणणं ज्यांना पटतंय त्यांनी मला सपोर्ट करा. या सगळ्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होत आहे आणि ते मी होऊ येणार नाही".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
असा योग अंगाशी आला! सोशल मीडिया स्टारविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा