'ती मला फॉलो करायची...', अशोक मामांनी शेअर केल्या रंजना देशमुखच्या काही रंजक गोष्टी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ashok Saraf on Ranjana Deshmukh : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना यांची ऑनस्क्रिन जोडी खूप हिट झाली. अनेक वर्षांनी अशोक सराफ यांनी रंजना यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी शेअर केल्यात.
advertisement
1/6

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि रंजना देशमुख. 80-90चा काळ या दोघांनी चांगलाच गाजवला. दोघांचे सिनेमे तुफान चालले. पण रंजना यांच्या अपघातानंतर दोघांची जोडी प्रेक्षकांनी खूप मिस केली.
advertisement
2/6
अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी ऑनस्क्रिन तर हिट ठरलीच पण ऑफस्क्रिन देखील त्यांचे खूप चांगले संबंध होते. रंजना यांनी अपघातानंतर अभिनयातून ब्रेक घेतला मात्र त्या काळातही त्यांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
advertisement
3/6
बिन कामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई', 'एक डाव भुताचा', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचूप गुपचूप', 'सुळावरची पोळी सारख्या सिनेमात अशोक सराफ आणि रंजना यांनी एकत्र काम केलं आहे.
advertisement
4/6
यातील बिन कामाचा नवरा हा सिनेमा तर सुपरहिट ठरला. आजही हा सिनेमा प्रेक्षक तितक्यात आवडीनं पाहतात.
advertisement
5/6
अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत अशोक सफार अनेक वर्षांनी रंजना यांच्याविषयी बोलले. त्यांच्या टॅलेंटचं कौतुक केलं. अशोक सराफ म्हणाले, "रंजना देशमुख खूप चांगली नटी होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय...मी हे करून दाखवीनच... मला हे यायलाच पाहिजे. असं तिचं असायचं."
advertisement
6/6
अशोक मामा पुढे म्हणाले, "ती मला फॉलो करायची हे तिनेच मला सांगतिलं होतं. मी तुला बघते आणि काम करते, असं ती मला म्हणाली होती. माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिचे रोल बघा. पण, तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती मला फॉलो करायची...', अशोक मामांनी शेअर केल्या रंजना देशमुखच्या काही रंजक गोष्टी