'AI चा वापर करुन माझ्या नावाने...' पुण्याच्या बसमधला VIDEO, PMPMLच्या नोटीसनंतर अथर्व सुदामेची पहिली रिअॅक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अथर्व सुदामे याने PMPML बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केल्याने वाद निर्माण झाला. PMPML ने नोटीस दिली असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे. या प्रकरणावर अथर्वची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
1/9

पुण्याचा प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला. स्थळ पुणे नावाने तो पुण्यातील अनेक मनोरंजक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र या व्हिडीओमुळे तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला.
advertisement
2/9
पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजे PMPML ने बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केला तसंच महिला प्रवाशाबद्दल आक्षेपार्ह आशय दाखवल्याचा आरोप करत नोटीस बजावली.
advertisement
3/9
अर्थव सुदामेवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. दरम्यान या वादावर अर्थवने पोस्ट शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/9
अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, "नमस्कार बरेचसे news channels आणि Media मधील माध्यमं माझं reel न बघत वाटेल ते लिहीत आहेत आणि पसरवत आहेत"
advertisement
5/9
"मी ना कोणाला बाइट दिलाय ना कोणाशी चर्चा केली आहे तरीही कोणीही काही वाक्य माझा फोटो आणि नाव वापरून पसरवत आहेत."
advertisement
6/9
"काही लोकं Ai चा वापर करून वाटेल ते विधान माझ्या नावानी खपवत आहेत त्यामुळे कृपया अश्या कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नका. मला जर काही बोलायचं असेल तर ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीन."
advertisement
7/9
अथर्वने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका बस कंटक्टरच्या वेशात आहे. त्याने PMPML चा ड्रेस आणि बॅच देखील लावला आहे. हातात ई-तिकिट मशीन देखील आहे. सार्वजनिक मालमत्तेचा व्यावसायिक रीलसाठी वापर करताना लेखी परवानगी घेतली नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
advertisement
8/9
अथर्व सुदामे नेहमीच त्याच्या मिश्किल अंदाजात पुणेरी विनोद करत असतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेक सामाजिक विषयांवरचे त्याचे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात.
advertisement
9/9
गणेशोत्सावत अथर्व सुदामेनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे खूप वाद झाला होता. अथर्वला त्याचा व्हिडीओ डिलिट करावा लागला होता. मात्र त्यानंतरही तो सातत्यानं चांगल्या आशयाचे आणि विषयाचे व्हिडीओ चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'AI चा वापर करुन माझ्या नावाने...' पुण्याच्या बसमधला VIDEO, PMPMLच्या नोटीसनंतर अथर्व सुदामेची पहिली रिअॅक्शन