TRENDING:

Bigg Boss च्या घरात नीट चालताही येत नव्हतं, आयुष संजीवच्या पायाला नेमकं झालेलं काय?

Last Updated:
अभिनेता आयुष संजीव बिग बॉस मराठी 6 मध्ये होता. त्याच्या पायाला काय झालं होतं असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर आयुषने स्वत: त्याच्या पायाच्या दुखापतीचं कारण सांगितलं.
advertisement
1/7
Bigg Boss च्या घरात नीट चालताही येत नव्हतं, आयुषच्या पायाला नेमकं झालेलं काय?
अभिनेता आयुष संजीव बिग बॉस मराठी 6 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र मागच्या आठवड्यात तो घराबाहेर पडला. घरात असतानाच त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं होतं. त्याला नीट चालतानाही येत नव्हतं. चालताना त्याला त्रास होत होता. त्यामुळे अनेक टास्क तो खेळू शकला नाही.
advertisement
2/7
बिग बॉसकडूनही त्याचं जुनं दुखणं बळावल्याचं सांगण्यात आलं होतं. आयुषच्या पायाला नेमकं काय झालं आहे? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. घराबाहेर आल्यानंतर अखेर आयुषनं त्याच्या दुखापतीचं कारण सांगितलं आहे. 
advertisement
3/7
घरातून बाहेर आल्यानंतर आयुषने त्याच्या दुखापतीबद्दल सांगितलं. तारांगणशी बोलताना आयुष म्हणाला, "गेल्या वर्षी माझा एक एक्सिडेंट झाला होता. त्या अपघातात माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. इनर थायमध्ये मला इंटरनल इन्जुरी झाली होती. मी शूट करत असतानाच हा अपघात झाला."
advertisement
4/7
या अपघातानंतर आयुषला जवळपास 3 ते 4 महिने पूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागली होती. योग्य उपचार आणि विश्रांतीमुळे तो बरा झाला होता. मात्र बिग बॉसच्या घरातील धावपळ, टास्क आणि सततचा वावर यामुळे जुनं दुखणं पुन्हा उफाळून आलं.
advertisement
5/7
आयुष म्हणाला, "इथे दोन-तीन टास्कदरम्यान आणि घरात वावरताना अचानक एक दिवस ती इन्जुरी आणि ते पेन पुन्हा वर आलं. मेडिकल सपोर्ट खूप चांगला होता. बिग बॉसच्या टीमने खूप सपोर्ट केला. पण रिकव्हरीसाठी एक शांत वातावरण लागतं, ती शांतता तिथे नव्हती."
advertisement
6/7
आयुषच्या या खुलाशानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दुखापतीवर मात करून तो लवकरच पुन्हा आपल्या कामात सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
आयुष संजीव अनेक वर्ष बिग बॉस सारख्या रिअलिटी शोमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करत होता. ज्या शोसाठी बॅक डान्सर म्हणून काम करत होता त्याच शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला. आयुषचा प्रवास अर्ध्यात संपला असला तरी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम त्याला मिळालं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss च्या घरात नीट चालताही येत नव्हतं, आयुष संजीवच्या पायाला नेमकं झालेलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल