131 मिनिटांची जबरदस्त क्राइम थ्रिलर, 'महाराजा' पेक्षाही दुप्पट सस्पेन्स; OTT रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी ठरली नंबर 1
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Crime Thriller on OTT: काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फिल्मने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. केवळ १३१ मिनिटांचा हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर नंबर १ ला ट्रेंड होतोय. प्रेक्षक म्हणतायत हा सिनेमा तर विजय सेतुपतीच्या 'महाराजा' फिल्मच्याही दोन पाऊल पुढचा आहे.
advertisement
1/8

सस्पेन्स थ्रिलर म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हमखास उभा राहतो, तो म्हणजे 'दृश्यम'मधला 'विजय साळगांवकर'. या फिल्ममध्ये त्याने जो काही धुमाकूळ घातला, तो आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. मात्र, दृश्यम ही एकमेव अशी फिल्म नाही, जिने प्रेक्षकांना आपल्या क्लायमॅक्सने वेडं केलं.
advertisement
2/8
काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फिल्मने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. इतकंच नाही, तर केवळ १३१ मिनिटांचा हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर नंबर १ ला ट्रेंड होतोय. प्रेक्षक म्हणतायत हा सिनेमा तर 'दृश्यम'च्याही दोन पाऊल पुढचं आहे.
advertisement
3/8
ही फिल्म म्हणजे ज्येष्ठ कलाकार संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेली 'वध २'. या चित्रपटाने ओटीटीच्या जगात अक्षरशः आग लावली आहे. ३ एप्रिल रोजी ही फिल्म गुपचूप रिलीज झाली, पण आज ती नेटफ्लिक्सवर टॉप १० मध्येही वरच्या स्थानावर आहे.
advertisement
4/8
या सिनेमाची गोष्ट म्हणजे, शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा) हा एक साधा पोलीस कर्मचारी, जो मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. कर्ज फेडण्यासाठी तो जेलमध्ये भाज्या पिकवून विकतो.
advertisement
5/8
याच दरम्यान, दोन खुनांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली मंजू सिंह (नीना गुप्ता) त्याच्या आयुष्यात येते. जेव्हा आमदाराचा मुजोर भाऊ केशव जेलमध्ये येतो, तेव्हा खरा सिनेमा सुरू होतो.
advertisement
6/8
केशवच्या गुंडगिरीने सगळे त्रस्त असतात, पण अचानक एक दिवस केशव आपल्या कोठडीतून गायब होतो. यानंतर असा सस्पेंस सुरू होतो, जो शेवटपर्यंत तुम्हाला श्वास रोखून धरायला लावतो.
advertisement
7/8
'दृश्यम'मध्ये विजय साळगांवकर पोलिसांना चकमा देण्यासाठी जबरदस्त प्लानिंग केली, पण 'वध २' ची गोष्ट त्याहून अधिक थरारक आहे. हा चित्रपट दाखवतो की, एक साधा माणूस परिस्थितीनुसार एक खूंखार गुन्हेगार कसा बनू शकतो.
advertisement
8/8
नीना गुप्ता यांच्या अभिनयाने कथेला एक भावनिक आणि तितकाच थरारक आधार दिला आहे. तर, संजय मिश्रा यांनी आपल्या शांत नजरेतून जे काही साध्य केलंय, ते भल्याभल्यांना घाम फुटला आहे. IMDb या सिनेमाला ७.५/१० अशी तगडी रेटिंग मिळाली आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
131 मिनिटांची जबरदस्त क्राइम थ्रिलर, 'महाराजा' पेक्षाही दुप्पट सस्पेन्स; OTT रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी ठरली नंबर 1